Share

विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होणार वाढ? काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री…

सध्या रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू झालेल्या युध्दाला 12 दिवस होऊन गेले. दोन्ही देशातील या युद्धाचा जगातील इतर देशांवर देखील परिणाम झाल्याचं दिसत आहे. या युद्धाचा कच्चा तेलाच्या किमतीवर थेट परिणाम झाला. कच्चा तेलाच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. आता भारतावर देखील याचा परिणाम होऊ शकतो, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे.

पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजेच 10 मार्चनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी देखील शक्यता वर्तवली आहे.

तसेच ते म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीमुळे आम्ही पेट्रोलियम पदार्थांचे भाव वाढवले नाहीत. असे म्हणणे चुकीचे ठरेल. सर्व कंपन्यांना तेलाचे दर ठरवावे लागतात. कारण त्यांनाही बाजारात टिकून राहावे लागते. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार तेलाच्या किमती ठरतात.

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आम्ही भारतात तेलाची कमतरता पडू देणार नाही. मात्र, पुढे जो काही निर्णय घेऊ, तो नागरिकांचे हित लक्षात घेऊनच करू, असे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

https://twitter.com/AHindinews/status/1501129320068427777?t=u_qXaKOJqHotJAylLdkfTQ&s=19

तसेच म्हणाले, आपले युवा नेते म्हणतात, लवकरात लवकर पेट्रोल टाक्या भरून घ्या, निवडणूका संपत आलेल्या आहेत. मात्र मी म्हणतो, टाकी आता भरा नाहीतर नंतर, पण कधी ना कधी निवडणुका येणारच आहेत. असे म्हणत विरोधकांवर टोला लगावला.

या पाचही राज्यांच्या निवडणूका संपल्यावर 10 मार्चनंतर पेट्रोल डिझेल च्या दरात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे सामान्य जनेतला याचा मोठा फटका बसणार आहे. नुकेतच कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर आता लोकांच्या खिशाला दरवाढीमुळे कात्री बसणार आहे. सध्या खाद्य तेलाच्या किंमती उच्च पातळीवर गेल्या आहेत.

राजकारण आर्थिक

Join WhatsApp

Join Now