Share

ब्रेकींग! झुंड चित्रपटाच्या विरोधात न्यायालयात याचिका; निर्मात्याला कोर्टाने ठोठावला १० लाखांचा दंड

महाराष्ट्रात सर्वत्र झुंड चित्रपटाचे वारे वाहत असतानाच या चित्रपटासंबंधीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शुक्रवारी झुंड चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल करणारे हैद्राबादमधील चित्रपट निर्माते नंदी चित्री कुमार यांना तेलंगणा उच्च न्यायालयाने 10 लाख कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

न्यायालयीन कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे कुमार यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार आता कुमार यांना एका महिन्याच्या आत ही रक्कम पंतप्रधान कोविड रिलीफमध्ये भरावी लागणार आहे. जर कुमार ही रक्कम भरू शकले नाही तर त्यांच्यावर न्यायालय पुन्हा एकदा कारवाई करु शकेल.

समोर आलेल्या माहितीनुसार, निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी फुटबॉलपटू अखिलेश पॉलच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाचे मालकी हक्क विकत घेतले होते. यानंतर त्यांना 2018 मध्ये समजले की, अखिलेश पॉलच्या टीमला प्रशिक्षण देणारे नागपूरचे विजय बारसी यांच्या जीवनावर आधारित एक हिंदी चित्रपट येत आहे.

कुमार यांना वाटले की, या चित्रपटात अखिलेश पॉलविषयी सुध्दा काही महत्वपूर्ण घडामोडी प्रदर्शित करण्यात येतील. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली. यानंतर 2020 मध्ये न्यायालयाने कुमार यांच्या बाजुने निकाल देत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली. विशेष म्हणजे न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर झुंड चित्रपटाचे दिग्दर्शक आणि नंदी कुमार यांच्यात काही समेट झाली.

त्यानुसार कुमार यांनी ठेवलेल्या सर्व अटी झुंडने मान्य केल्या आणि चित्रपट प्रदर्शित करण्यास कुमार यांच्याकडून परवानगी मिळवली. यानंतर कुमार यांनी सुध्दा न्यायालयात चित्रपटावरील बंदी हटवण्यात यावी अशी याचिका दाखल केली. यावेळी न्यायालयाने सांगितले की, जो पर्यंत या याचिकेचा निकाल लागत नाही तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये.

परंतु न्यायालयाने निकाल देण्यापुर्वीच झुंड चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. यामुळे न्यायालयाने कुमार यांची याचिका अमान्य करत त्यांना दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केल्याप्रकरणी आता कुमार यांना दंड म्हणून 10 लाख रुपये भरावे लागणार आहेत. हा दंड 30 दिवसांच्या आत भरणे अनिवार्य असणार आहे.

महत्वाच्या बातम्या
जडेजाचे द्विशतक पूर्ण न होण्यास नक्की कोण जबाबदार? रोहित शर्माने केला मोठा खुलासा
‘आश्रम’मधील बबिताचा हॉट अवतार पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम, ह्रदयावर ताबा ठेवणे झाले अवघड
‘तुम्ही सांगाल ते करायला पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?’ इम्रान खान का भडकले? वाचा..
नागराज मंजूळेंवर टीका करणाऱ्या शेफाली वैद्यांना नेटकाऱ्यांनी झापलं; म्हणाले, क्यूँ हिला डाला ना…

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now