विश्वसुंदरी असा अभिनेत्री ऐश्वर्या राय चा उल्लेख केला जातो. तिच्या सौंदर्याने तिने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. ती आयुष्यात जेवढी यशस्वी झाली तेवढाच तिने अनेक अडचणींचा सामना देखील केला आहे. तिचे अनेक सिनेमे अपयशी ठरले.
ऐश्वर्याचे काही सिनेमे चाहत्यांच्या पसंतीस उतरले, मात्र बऱ्याच सिनेमात तिला अपयशाचा सामना करावा लागला. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, एका सिनेमात ऐश्वर्याने किसिंग सीन दिल्यामुळे तिला लीगल नेटीस देखील पाठवण्यात आली होती.
२००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या धूम २ सिनेमात ऐश्वर्याने हृतिक रोशनसोबत किसिंग सीन दिला होता. तेव्हा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली. माहितीनुसार, ऐश्वर्याला किसिंग सीन दिल्यामुळे लीगल नोटीस देखील पाठवण्यात आली होती. त्यावेळी याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू होती.
तिला तिच्या अनेक चाहत्यांनी यावरून ट्रोल देखील केलं. ‘आमच्या मुलींसाठी तू आदर्श आहेस तूच असे सीन दिले तर आमच्या मुलींनी काय शिकावं’ अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या होत्या. हा मुद्दा त्यावेळी प्रचंड चर्चेत आला होता.
माहितीनुसार, बॉलिवूडमध्ये अपयशी ठरलेली ऐश्वर्या आता टॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे. चित्रपट निर्माता मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘पोनियान सेल्वम १’, जो एक पीरियड ड्रामा आहे. ज्यामध्ये दक्षिण सुपरस्टार विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला सिनेमा कल्की कृष्णमूर्तीच्या १९५५ मध्ये आलेल्या ‘पोनियान सेल्वम’ नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. ऐश्वर्याचा सिनेमा ३० सप्टेंबर रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. साऊथ सिनेमा असला तरी, हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. ऐश्वर्याच्या या आगामी सिनेमाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून आहे.