Share

…अन् जनता चप्पल-दगड घेऊन मागे धावली ; भाषण अर्धवट सोडून मंत्र्यांनी ठोकली धूम

crime

अनेकदा नेते मंडळींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशी अनेक प्रकरण आतापर्यंत समोर आली आहे. मतदान मागण्यासाठी गेलेले नेते मंडळी अनेकदा अडचणीत सापडल्याच आपण पाहिले आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. चक्क मंत्र्यांमागे जनता चप्पल-दगड घेऊन मागे धावली आहे.

वाचा नेमकं काय घडलं..? हा प्रकार हैद्राबाद येथील असल्याच उघडकीस आलं आहे. कामगार मंत्री एम.मल्ला रेड्डी (M Malla Reddy) यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी एका कार्यक्रमात  सामील होण्यासाठी तेलंगणातील घाटकेसर येथे आले होते.

तिथेच हा सर्व प्रकार घडला. यावेळी कार्यक्रमादरम्यान नागरिकांना संबोधित करताना मल्ला रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं कौतुक केले. मात्र  काही लोकांनी याला तीव्र विरोध केला. बघता बघता ये प्रकरणाला वेगळे वळण लागले. कार्यक्रमादरम्यान नागरिक संतप्त झाले.

तेथे कार्यक्रमात उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मल्ला रेड्डी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे, काही लोकांनी चप्पल-शूज, दगड आणि खुर्चींनी हल्ला केला. यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी मंत्र्यांना स्टेज सोडून बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. हा सर्व प्रकार लक्षात येताच भाषण अर्धवट सोडून मंत्र्यांनी तेथून धूम ठोकली. यामुळे काही काळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत केले.

पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. तसेच या घटनेची घाटकेसरचे पोलीस इन्स्पेक्टर एन. चंद्र बाबू यांनी माध्यमांसमोर येत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. या घडल्या प्रकाराबद्दल अद्याप मंत्री एम.मल्ला रेड्डी (M Malla Reddy) यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहे; मुख्यमंत्र्यांनी केलं मोदींचं तोंडभरुन कौतूक
VIDEO : तडफडून झाला केके यांचा मृत्यू? वारंवार पित होते पाणी; शेवटच्या क्षणांचा ‘तो’ धक्कादायक व्हिडिओ आला समोर
केकेचा मृत्यू मॉब लिंचिंगसारखाच! चाहत्याने सांगितले ऑडिटोरिअममध्ये नेमकं काय घडलं…
वाढदिवस विशेष: लिलावात कोणीच खरेदी केले नाही, तोच पाटीदार नंतर बनला RCB चा हुकूमी एक्का

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now