Share

पुणेकरांनो! वाहतुक पोलिसांना आता थेट दंड आकारता येणार नाही, ‘या’ पद्धतीने होणार कारवाई

पुणेकरांनी आता वाहतुकीचे नियम मोडल्यास थेट दंड आकाराला जाणार नाही.तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बऱ्याचदा वाहतुकीचा कोणताही नियम मोडला नसताना वाहनचालकांकडून वाहतूक पोलिस मनमानी करून पैसे घेतात. पोलिसांच्या या बंडखोरी वृत्तीला आळा बसण्यासाठी पुणेकरांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली होती.यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही निवेदन दिले होते.

त्यामुळे अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे. ‘ पुढील आदेश येईपर्यंत वाहतूक पोलीस दंड आकारू शकत नाहीत ‘, असा निर्णय अमिताभ गुप्ता यांनी घेतला आहे. त्यामुळे आता इथूनपुढे बंडखोर पोलिस मनमानी करून वाहनचालकांकडून बेकादेशीररित्या दंड आकारू शकत नाहीत.

देशात वाहतुकीचे नियम कठोर असतानाही नागरिक नियमांचे उल्लंघन करतात. परंतु अनेक वेळा वाहनचालकाने वाहतुकीचा नियम मोडला नसला तरी त्याच्याकडून पोलिस बळजबरीने दंड आकारतात. त्यामुळे वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये टोकाचे वाद होतात. याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांविरुद्ध अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.

‘ पुढील आदेश येईपर्यंत वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांकडून कोणत्याही स्वरूपाची दंडात्मक रक्कम वसुल करू नये. आपण फक्त वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यामुळे शहरात असणाऱ्या सीसीटीव्हीद्वारा दंड आकारावा’, असे पत्रक अमिताभ गुप्ता यांनी काढले आहे.

त्याचबरोबर केवळ पुण्यातच टोइंगच्या नावाखाली वाहन चालकांकडून लूट केली जात आहे. त्यामुळे टोइंगची भुर्दंड कशासाठी असा सवाल पुणेकर उपस्थित करत आहेत. त्यामुळे मुंबईप्रमाणे पुण्यातही ‘ नो – पार्किंग ‘ मधील वाहने उचलून नेण्याची कारवाई प्रायोगिक तत्त्वावर बंद करावी, अशी मागणीही पुणेकर करत आहेत.

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now