Share

narendra modi : गुजरात दौरा फ्लॉप? मोदींचं भाषण सुरू होताच प्रेक्षका गेले निघून, सभेचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Narendra Modi

narendra modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतं असून नागरिकांना संबोधित करतं आहेत. मात्र असं असतानाच सध्या पंतप्रधान मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

अहमदाबादमध्ये पंतप्रधान भाषण करत असताना पाठीमागे प्रेक्षकांनी मात्र काढता पाय घेतला. सभा सोडून जाणाऱ्या प्रेक्षकांचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. विरोधकांनी याचाच धागा पकडत मोदींवर तसेच केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. यावरून आता राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे.

वाचा नेमकं काय घडलं?
अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी हिमाचल प्रदेशचा दौरा केला होता. त्या दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे. मोदींचं भाषण सुरू होताच प्रेक्षक निघून जात असल्याची घटना घडली. वरून सध्या आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे.

त्याचं झालं असं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान गुजरातमध्ये एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. पंतप्रधान भाषण करत असताना पाठीमागे प्रेक्षकांनी मात्र काढता पाय घेतला. तसेच हा व्हिडीओ क्रॉंग्रेसचे सोशल मीडिया एक्सपर्ट नत्ताशा शर्मा आणि नितिन अग्रवाल यांनी ट्विट केला आहे.

https://twitter.com/nitinagarwalINC/status/1575828599562596353?s=20&t=YFoSiSicbCxD7zmeqwehFw

‘देशात आता परिवर्तन सुरू झाल्याचा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावला आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचं म्हंटलं आहे. सध्या या व्हिडिओवरून राजकारण तापलं आहे. मोदी २ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी तब्बल ३४०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare : आमचा दसरा मेळावा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा असेल; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
raj thackeray : दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी आधीच दिला होता मुख्यमंत्र्यांना मोलाचा सल्ला
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम
Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now