Share

Ayodhya : अयोध्येत लागलेल्या दिव्यांमधून तेल काढण्यासाठी गरीबांची धावपळ

ayodhya

people in ayodhya get oil on bridge diyas  | रविवारी म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी अयोध्येत रामाच्या चरणी १५ लाख ७६ हजार दिवे प्रज्वलित करण्याचा विश्वविक्रम झाला. पण दिवे विझताच घाटाचे दृश्य वेगळे होते. तिथे जवळपास राहणारे गरीब वर्गातील लोक तेल गोळा करताना दिसले. अयोध्येतील दीपोत्सवानिमित्त सरयू पायडीचे ३७ घाटात दिवे लावण्यात आले होते.

दीपोत्सवात १५ लाखाहून अधिक दिव्यांमध्ये ६० हजार लिटर मोहरीचे तेल भरण्यात आले होते. ३७ घाटांवरील दिवे विझल्यावर तिथल्या जवळचे लोक हातात भांडे घेऊन पोहोचले. ते मोहरीचे तेल भांड्यात भरताना दिसत होते. मोहरीचे तेल २०० रुपये लिटर असून ते येथे मोफत मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते तेल घेऊन घरी जाऊन दिवाळी साजरी करणार होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह प्रमुख पाहुणे निघाल्यानंतरच लोक दिव्यांना तेल गोळा करण्यासाठी घाटावर पोहोचले. यामध्ये लहान मुले, महिला, युवक, वृद्ध, सर्वजण तेल गोळा करताना दिसत होते. हे लोक तासनतास दिव्यांतून तेल गोळा करून ते बाटल्या, भांड्यांमध्ये भरत होते.

बहराइचमधील एका गावात राहणारी पूजा कुटुंबासह १६ क्रमांकाच्या घाटावर असलेल्या दिव्यातून बाटलीत तेल ओतत होती. दोन दिवसांपूर्वी ते कुटुंबासह अयोध्येत तेल गोळा करण्यासाठी आले असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वेळी १० लिटर तेल जमा झाले, जे सुमारे सहा महिने चालले. श्रावस्ती येथे राहणारी दीपा गावातील लोकांसह १४ क्रमांकाच्या घाटावर तेलाचा डबा भरत होती.

दीपा म्हणाली की, तिच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. आई आजारी आहे. मी घरातील मोठी मुलगी, त्यामुळे माझ्यावर जबाबदारी आहे. मी गावातील लोकांसोबत तेल गोळा करायला आलो आहे. २०० रुपयांनी तेल विकत घ्यावे लागते ते परवडत नाही. त्यामुळे ते तेल गोळा करण्यासाठी तिथे आले होते.

अशात काही कामगारांनी सांगितले की, सणासुदीच्या काळात एक-एक रुपयांसाठी धावपळ करावी लागते. आता आमच्याकडे पैसेही नाही. तर एका रघूवीर नावाच्या रहिवास्याने म्हटले की, आम्ही तेल आधी गरम करुन घेतो आणि त्यातून ते गाळून स्वच्छ करुन घेतो. त्यानंतर ते स्वयंपाकासाठी वापरतो.

महत्वाच्या बातम्या-
Rishi Sunak : “कुणी विचार तरी केला होता का की दिवाळीला एक भारतील ब्रिटनचा पंतप्रधान होईल”
Virat Kohli : विराटने ‘त्या’ ३ धावा काढल्या तर पाकिस्तान म्हणायला लागला चीटर, ICC ने नियम दाखवत बोलती केली बंद
Axar Patel : नॉट आऊट होता अक्षर पटेल? रिझवानच्या स्टंपिंगवरुन उडाला गोंधळ; पहा व्हिडिओ

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now