Share

नानांच्या लेकाचं साधं राहणीमान पाहून लोकं थक्क, वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत करतोय ‘हे’ काम

अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे मराठीसोबतच हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. त्यांच्या अभिनयामुळे त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर त्यांचे अनेक चाहतेदेखील आहेत.

प्रसिद्धी खूप असूनही नानांचे राहणीमान अगदी सामान्य लोकांसारखेच आहे. त्यांच्या मुलानेही त्यांच्या पावलावर पाउल ठेवले आहे. आपल्या वडिलांसारखा मल्हार अगदी साधा राहतो. आपण एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे, असा गर्व त्याच्या अंगी नाही. त्याने वडिलांचे सगळे गुण घेतले आहेत.

वडिलांसारखेच त्यानेही मोठ्या पडद्यावर नाव कमावल आहे. ‘द लिटल गॉड फादर ‘  या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्याने एक छोटीशी भूमिका साकारली होती. अभिनयासोबतच तो एक उत्तम दिग्दर्शक आणि निर्मातादेखील आहे.

मल्हारने  राम गोपाल वर्मा यांच्या ‘द ॲक्ट्स ऑफ २६/११ ‘ या चित्रपट सहायक दिग्दर्शकाचे काम केले आहे. त्याचबरोबर त्याने ‘अब तक छपन्न’ या नानांच्या चित्रपटात सहायक दिग्दर्शकाचे काम केले आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या ‘ नाम’  या संस्थेमध्येही तो काम करतो. सध्या तो नाना पाटेकरांच्या ‘नाना साहेब प्रोडक्शन’ या प्रोडक्शन हाउसमध्ये काम करत आहे.

प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा असूनही सध्या राहणीमानामुळे त्याचे कौतुक होत आहे. त्याचे आणि त्याच्या वडिलांचे खूप घट्ट नाते आहे. त्याचबरोबर तो त्याच्या आईवरही खूप प्रेम करतो. कोट्यावधींची संपत्ती असूनही ते साधे राहतात. त्यांनी त्यांची सगळी संपत्ती गरजू लोकांना दान केली आहे.

मुंबईमधील सरस्वती मंदिर हायस्कूलमध्ये त्याने शिक्षण घेतले असून पुढे वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे. त्याला लहानपणापासून चित्रपटात कम करण्याची आवड होती. तो प्रकाश झा यांच्या चित्रपटात काम करणार होता. परंतु नाना आणि प्रकाश झा यांच्या भांडणामुळे त्याने त्यांच्या चित्रपटात काम केले नाही.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now