payal father revenge in noida | नोएडामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका तरुणीने आरोपीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. पण तिने कट रचत दुसऱ्या एका तरुणीची हत्या केली आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे.
एखाद्या हिंदी सिनेमाप्रमाणे हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे पोलिस हैराण झाले आहे. संबंधित घटना ही दिल्लीतील नोएडामधील बिसरख या परिसरात घडली आहे. हत्या करणाऱ्या तरुणीचे नाव पायल असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तिला ताब्यातही घेतले आहे.
काही महिन्यांपूर्वी पायलच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासूनच पायलला आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घ्यायचा होता. त्यासाठी तिने एक प्लॅन केला होता. सर्वात आधी तिने आरोपीला शोधून काढलं. त्याचे नाव अजय होते. तिने त्याच्यासोबत फेसबूकवर मैत्री केली. हळू हळू त्या मैत्रीचं रुपांतर तिनं प्रेमात केलं.
त्यानंतर तिने आपल्यासारख्याच असणाऱ्या एका तरुणीचा शोध घ्यायला अजयला सांगितलं. त्याने शोध घेतल्यानंतर त्या दोघांनी मिळून तिची हत्या केली. तसेच तिच्या चेहऱ्यावर ऍसिड ओतले. त्यानंतर पायलने तिचे कपडे तिला घातले. तिला असे दाखवायचे होते की वडिलानंतर अजयने तिचीही हत्या केली.
दोघांनी मृतदेहाला फेकून दिले. त्यानंतर पोलिसांच्या तो नजरेस पडला. तोपर्यंत पायलच्या कुटुंबियांनी पायल सापडत नसल्याची तक्रार पोलिसांत केली होती. त्यामुळे तीच पायल असल्याचे सांगत पोलिसांनी दुसऱ्या तरुणीचा मृतदेह पायलच्या कुटुंबियांना सोपवला. त्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कारही केले.
अशात दुसऱ्या तरुणीच्या कुटुंबियांनी पण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनी तपास केल्यानंतर सर्व गोष्टी समोर आल्या आहे. आता पोलिसांनी पायल आणि अजयसह ४ जणांना ताब्यात घेतलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
Atul : एकावेळी दोन मुलींशी लग्न करणाऱ्या अतुलचा खरा चेहरा आला समोर; तिन्ही बायकांनी दाखल केली तक्रार
..म्हणून पुण्यात येणाऱ्या ब्रिजभुषणला मनसे विरोध करणार नाही; समोर आले चक्रावून टाकणारे कारण
तात्या भंगार माणसांमुळे पक्ष सोडू नका, तुमच्यात आम्हाला राजसाहेब दिसतात; कार्यकर्त्यांची कळकळीची विनंती