Share

‘श्रीलंकेतील नेते पळून गेले, त्याप्रमाणे पवारांना पळून जावं लागेल’; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

भाजपकडून मिशन बारामती या निमित्ताने आयोजित मेळाव्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. ज्याप्रमाणे श्रीलंकेतील नेते पळून गेले होते, त्याप्रमाणे शरद पवार यांना पळून जावं लागणार असे पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर यांनी यावेळी, लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील खोचक टीका केली. म्हणाले, एखाद्याचं लुबाडून घ्यायचं, फसून घ्यायचं, यामध्ये त्यांना प्रचंड आनंद असतो. २०१९ ला जेव्हा विश्वासघाताने सरकार आलं, तेव्हा पहिल्या अधिवेशनावेळी सुप्रिया सुळे खुश होत्या.

तेव्हा सुप्रिया सुळे या एखादी वरमाई जशी नटून थटून लग्नात घाई करत असते, अशा थाटात याचे स्वागत कर, त्याचे स्वागत कर, करायच्या जणू काय जनतेनेच त्यांना निवडून दिलंय अशा वागत होत्या. आता त्या सतत महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत आहेत.

पण आता मी सुप्रिया सुळेंना सांगू इच्छितो, तुम्ही आता अजिबात चिंता करू नका. तुम्ही आणि तुमच्या घराण्याने ५० वर्षे खूप सेवा केली. आता तुम्हाला सक्तीच्या विश्रांतीची गरज आहे. २०२४ मध्ये जनता तुम्हाला सक्तीच्या विश्रांतीवर पाठवेल, असा दावा पडळकर यांनी केला.

तसेच म्हणाले, आपण सर्वजण ज्याप्रमाणे गणपतीचं विसर्जन करतो, त्याप्रमाणे २०२४ मध्ये पवारांच विसर्जन करायचं आहे. त्यासाठीच आज बारामतीत आलो आहे. आपण जिल्ह्यात संघटन टिकवलं आहे, विश्वासघाताने आलेलं सरकार टिकले नाही.

म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाने निर्मला सितारामन यांच्यावर बारामती मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. निर्मला सितारामन मॅडम या बिन टाक्याचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. एकदा त्या बारामतीत आल्या तर पवारांना कळणारही नाही ऑपरेशन कसं झालं, असे पडळकर म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now