छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट नुकताच १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत असून चित्रपटाची यशस्वीरित्या वाटचाल सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता अंकित मोहनने ‘रायाजी’ ही भूमिका साकारली आहे. तर अंकित मोहनची बायकोसुद्धा (Ankit Mohan Wife) अभिनेत्री असून तिनेही या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारली आहे. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊया.
पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबत रायाजी बांदल यांनीही आपल्या प्राणांची आहुती दिली होती. तर अशा शूरवीर रायाजी बांदल अर्थात श्रीमंत रायाजीराव बांदल यांची भूमिका अंकित मोहनने ‘पावनखिंड’ या चित्रपटात साकारली आहे. तर अभिनेत्री प्राजक्ता माळीने या चित्रपटात रायाजी यांच्या पत्नी श्रीमंत भवानीबाई बांदल यांची भूमिका साकारली आहे.
अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सोयराबाई यांची भूमिका अंकित मोहनच्या पत्नीने साकारली आहे. तर अंकित मोहनची पत्नी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी अभिनेत्री रूची सावर्ण मोहन होय.
रूची सावर्ण ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठी आणि हिंदीतील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. रूचीला ‘कुमकुम भाग्य’, ‘कुंडली भाग्य’, ‘घर आजा परदेसी’ यासारख्या मालिकेतील भूमिकांमुळे ओळखले जाते. यापूर्वी तिने दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिखस्त’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
अंकित मोहनबद्दल बोलायचे झाल्यास तो स्टार प्लसवरील ऐतिहासिक ‘महाभारत’ या मालिकेत दिसला होता. या मालिकेत त्याने ‘अश्वत्थामा’ची भूमिका साकारली होती. तसेच त्याने ‘नागिन -३’, ‘रोडिज’, ‘नमक हराम’, ‘शोभा सोमनाथ की’, ‘बसेरा’ यासारख्या मालिकेत काम केले आहे.
रूची सावर्ण आणि अंकित मोहनच्या लव्हस्टोरीची सुरुवात ‘घर आजा परदेसी’ या मालिकेदरम्यान झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे २ डिसेंबर २०१५ साली विवाहबंधनात अडकले. नुकतीच रूची आणि अंकित आई-बाबा झाले असून यासंदर्भातील माहिती त्यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी शेअर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
आज करोडोची मालकीन असणाऱ्या कंगनाकडे एकेकाळी कपडे घ्यायलाही पैसे नव्हते
महेश भट फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना ड्रग्ज व पोरी पुरवतात; सुनेच्या गंभीर आरोपांनी उडाली होती खळबळ
महेश भट्ट यांनी मुलगी पुजाबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ लज्जास्पद इच्छा, लिपलाॅक किस देखील केला होता