हर हर महादेव म्हणत ‘पावनखिंड’ (Pavankhind Movie) हा चित्रपट १८ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत असून चित्रपट प्रेक्षकांना खूपच भावला आहे. चित्रपटाची घौडदौड यशस्वीरित्या सुरु असून १० दिवसांतच चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. यासंदर्भात चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या कमाईबाबत आकडे सांगणारा एक ट्विट केला. यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘पावनखिंड हा मराठी चित्रपट सुपरहिट ठरला आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची घौडदौड कायम आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने १२.१७ कोटी, दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी १.०२ कोटी, शनिवारी १.५५ कोटी आणि रविवारी १.९७ कोटी असे एकूण १६.७१ कोटींचा व्यवसाय केला आहे’.
यासोबतच सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरु असतानाही चित्रपटाने एवढी मोठी कमाई केल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तरण आदर्श यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘हर हर महादेव’ असे म्हटले आहे. दिग्पाल यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत शुभेच्छा देत आहेत.
नुकतीच सोशल मीडियावर ‘पावनखिंड’ चित्रपटासंबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये ‘पावनखिंड’ चित्रपट सुरु होताच सिनेमागृहात काही युवकांनी शिवगर्जना देण्यास सुरुवात केली होती. हिस्ट्री (History) नावाच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ३६ सेकंदाचा हा व्हिडिओ नक्कीच सर्वांच्या अंगावर काटा आणणार असा होता.
दरम्यान, ‘पावनखिंड’ हा चित्रपट म्हणजे दिग्पाल यांनी संकल्प केलेल्या ‘शिवराज अष्टका’तील तिसरं पुष्प आहे. यापूर्वी दिग्पाल यांच्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिखस्त’ या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. तर आता पावनखिंड या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी पावनखिंडीत दिलेल्या लढ्याचा थरार पाहायला मिळत आहे.
ए. ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आल्मंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर चिन्मयसोबत या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, अंकित मोहन, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, असे अनेक कलाकारसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
‘मी त्याला फोन लावला आणि त्याने मला एकटीला भेटायला बोलावलं’, अभिनेत्रीच्या खुलाश्याने खळबळ
‘कच्चा बदाम’ फेम भुबन बड्याकर यांच्या अपघाताचे खरे कारण आले समोर, वाचा नेमकं काय घडलं..
‘तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंस’; कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावूक पोस्ट