राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या गाठी – भेटींच सत्र वाढलेलं पाहायला मिळतं आहे. सत्ताधारी – विरोधकांमद्धे जोरदार चढाओढ सुरू आहे. दौरे, बैठका, गाठी – भेटींसाठी राजकीय नेते मंडळी मैदानात उतरले आहेत.
अशातच एक मोठी बातमी समोर येतं आहे. राष्ट्रवादी – कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी थेट आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
पार्थ पवार यांची ही भेट राजकीय चर्चेचा एक भाग बनली आहे. अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. शिंदे गटाच्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस विशेषत: अर्थखात्याकडून निधीवाटपात डावलण्यात येत असल्याचा आरोप करत ठाकरे सरकारची साथ सोडली होती.
असं असलं तरी देखील अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार हे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र या भेटीमागील कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल तुफान व्हायरल झाला आहे.
पार्थ पवार यांनी वर्षा इथे जाऊन गणपतीचे दर्शन घेतले..खासदार डॉ श्रीकांत शिंदे उपस्थित होते.#ParthPawar pic.twitter.com/DW1zH6ilTc
— Valli S Rajan (@vallir51) September 7, 2022
दरम्यान, व्हिडिओत पाहायला मिळत आहे की, पार्थ यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जावून बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी श्रीकांत शिंदे उपस्थित होते. गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पार्थ पवार आणि श्रीकांत शिंदे यांनी काही काळ गप्पाही मारल्या. मात्र भेटीतील तपशील अद्याप समोर आलेला नाहीये.
विशेष बाब म्हणजे, सध्या गणेशोत्सवाचं औचित्य साधून सर्वच पक्षातील नेते एकमेकांकडे जातं आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
Supreme Court : शिंदेगटाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, ठाकरे गटाला मोठा दिलासा; पहा काय घडलं कोर्टात…
Girish Bapat : …म्हणून मी पक्षावर नाराज आहे; पुण्यातील भाजपच्या बड्या नेत्याने जाहीरच सांगीतले






