विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ११ मार्च रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तर चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करत असून अनेकजण या चित्रपट, दिग्दर्शक आणि यामधील कलाकारांचे कौतुक करत आहेत. यादरम्यान बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी या चित्रपटासंबंधित एक ट्विट करत चित्रपटाला समर्थन दिले. मात्र, या ट्विटमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
अभिनेते परेश रावल कोणत्याही मुद्द्यावर सरळ आणि बिनधास्तपणे आपले मत मांडत असतात. तर ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला समर्थन देत त्यांनी एक ट्विट केला. यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘जर तुम्ही भारतीय असाल तर तुम्ही ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट नक्की पाहा’. यासोबतच परेश रावल यांनी या ट्विटमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना टॅग केले.
https://twitter.com/SirPareshRawal/status/1502567323684642817?s=20&t=jtrgSoVlcoH-NjXffnN0EA
तर परेश रावल यांच्या या ट्विटवर विवेक अग्निहोत्री यांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कमेंट करत लिहिले की, ‘परेश भाई की जय हो’.
https://twitter.com/vivekagnihotri/status/1502589190936141824?s=20&t=WqvBaOrbc12oHs_jCP5DqA
परेश रावल यांच्या या ट्विटवर अनेकजण कमेंट करत ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट खरंच पाहावे, असे सांगत आहेत. तर दुसरीकडे मात्र, अनेकजण त्यांना यावरून ट्रोलही करत आहेत.
https://twitter.com/Thiru353039211/status/1503075939940331522?s=20&t=WqvBaOrbc12oHs_jCP5DqA
एकाने त्यांच्या ट्विटवर कमेंट करत लिहिले की, ‘आम्ही भारतीय आहोत आणि असे चित्रपट पाहून आम्हाला ते सिद्ध करण्याची गरज नाही’. दुसऱ्या एकाने ट्विट करत लिहिले की, ‘माफ कर काश्मीर फाईल्स. मी डोक्याने आणि ह्रदयाने भारतीय आहे’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘जर तुम्ही भारतीय असाल तर धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या राजकीय पक्षाचा भाग बनू नये. तसेच स्वतःला सर म्हणून संबोधित करून घेणे ही तुमची असुरक्षितता दाखवते ‘सर’.
If u r an Indian u should not be part of a political party that spreads religious hatred @SirPareshRawal . Also knighting urself as sir shows ur insecurity ‘sir ‘ #Hypocrites https://t.co/PTc1dr1yfR
— Sameer G (@sameer27038259) March 13, 2022
I am an Indian and I won't watch this propaganda movie #KashmirFiles even if you pay me to watch it. https://t.co/C03NIpSxbZ
— ʞnꓕ ʞnꓕ ǝɥʇ (@amtuktuk) March 14, 2022
https://twitter.com/The_Unsean/status/1503263996098449408?s=20&t=WqvBaOrbc12oHs_jCP5DqA
यादरम्यान प्रसिद्ध निवेदिका शिवानी धर सेननेसुद्धा परेश रावल यांच्या ट्विटवर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिले की, ‘मी भारतीय आहे आणि काश्मिरी पंडितसुद्धा. तरीही मी हा चित्रपट पाहणार नाही. तुमच्या स्वतःच्या द्वेषाला खतपाणी घालण्यासाठी आमच्या काश्मिरी पंडितांच्या इतिहासाचा वापर करणे पुरे झाले आता’.
दरम्यान, ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट १९८९-९० च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मृणाल कुलकर्णी असे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तर प्रदर्शनानंतरही हा चित्रपट फार चर्चेत आहे. नुकतीच चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता अनेक राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
सेटवर १५ वर्षीय रेखासोबत घडला होता ‘हा’ भयानक प्रकार, ढसाढसा रडली होती रेखा, कर्मचारी वाजवत होते शिट्ट्या
प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता तीन राज्यांत ‘द काश्मिर फाईल्स’ करमुक्त, चित्रपटाने केली छप्परफाड कमाई
बच्चन पांडे बनताना अक्षय कुमारची लागायची वाट; तब्बल ‘इतके’ तास लागायचे मेकअप करायला