Share

नऊवारी नेसून मारली आकाशातून उडी; तिरंग्याला सलामी देत पुण्याच्या शीतल महाजनचा राष्ट्रीय विक्रम

shital mahajan

७३ वा प्रजासत्ताक दिन या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पद्मश्री शीतल महाजन (राणे) हिने अनोख्या पद्धतीने तिरंग्याला सलामी दिली. अशाप्रकारे नऊवारीत पॅरामोटारमधून पॅराजम्प करणारी ती पहिलीच भारतीय महिला असून तिने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत शीतलच्या नावावर १८ राष्ट्रीय आणि ६ जागतिक विक्रमांची नोंद आहे. पुणेकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. (parajumping-shital-mahajan-nauwari-saree)

शीतलने नऊवारी साडी आणि मराठमोळा साज करत हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे पॅरामोटरच्या साहाय्याने सहा हजार फुटांवरून पॅराजम्पिंग करून तिरंग्याला सलामी दिली. अशाप्रकारे नऊवारीत पॅरामोटारमधून पॅराजम्प करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. यामुळे तिने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.

याबाबत बोलताना शीतल महाजन म्हणाल्या, ‘आतापर्यंत साडी घालून मी भारताबाहेर अनेक ठिकाणी स्कायडायिव्हग केले परंतु, जन्मभूमी असलेल्या पुणे शहरात नऊवारी साडी घालून पॅरामोटारमधून पॅराजिम्पग केल्याने ही विशेष पॅराजम्प माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे.’

तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘स्कायडायव्हिंग खेळात पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धेत मी सहभागी झाली आहे. आतापर्यंत माझ्या नावावर १८ राष्ट्रीय आणि ६ जागतिक विक्रमांची नोंद आहे. जगातील सात खंडात स्कायडायव्हिंग करणारी मी पहिली भारतीय महिला आहे.’

शीतल महाजन यांचा जन्म पुण्यात झाला असून, मूळचे गाव जळगाव असलेली शीतल ही बहिणाबाई चौधरी यांची पणती आहे. बहिणाबाई चौधरीचे नातू कमलाकर महाजन यांची सुकन्या. बालपणापासूनच शीतलला काहीतरी नवे करण्याचा ध्यास होता. यातच तिला पॅराशूट जंपिंगची आवड निर्माण झाली.

शीतल महाजन यांनी १७ सप्टेंबर २०१७ पर्यंत ७०० पॅराशूट जंप केल्या आहेत. त्यापैकी काही १३,५०० फुटावरून आणि काही १८,००० फुटावरून केल्या आहेत. त्यांची एक पॅराशूटउडी ही ऑक्सिजनच्या सहाय्याने ३० हजार फुटांवरून केली आहे. ७ विविध प्रकारच्या विमानांतून जगातील सातही खंडांतील विविध ठिकाणांवर, जसे की उत्तर ध्रुव (आर्क्टिक) आणि दक्षिण ध्रुव (अंटार्क्टिका) आणि भारत व फिनलॅन्ड, अमेरिका, स्पेन ,ऑस्ट्रेलिया, युरोप, साऊथ आफ्रिका, साऊथ अमेरिका येथे त्यांनी पॅराशूट जंप केल्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या
जेव्हा ‘या’ अभिनेत्रीमुळे अजय देवगनच्या मुलाने दिली होती त्याच्या कानाखाली, वाचा पुढे काय घडले..
गेहराईयाँमधल्या ‘त्या’ इंटिमेट सीन्सवर दीपिका पादुकोणचा हैराण करणारा खुलासा; म्हणाली…
PHOTO: उर्वशी रौतेलाने पिंक फ्लोरल बिकीनीवर सोशल मिडीयाचे वाढवले तापमान, चाहते म्हणाले, ठंड में आग..
नागिन ६ मालिकेबद्दल झाला मोठा खुलासा, ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भुमिका

इतर ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now