Share

उमेदवारी न दिल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक संतापले, थेट केंद्रीय मंत्र्याच्या कार्यालयावर हल्ला

राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. यामध्ये भाजपने मोठा विजय मिळवला आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणूकीची चर्चा रंगली आहे. या निवडणूकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी दोन उमेदवारांना रिंगणात उतरवलं आहे. (pankja munde supporter attack on bjp leaders)

तसेच भाजपनेही त्यांच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि पाचव्या जागेवर उमा खापरे असणार आहे. या सर्वांना उमेदवारी भेटली पण पंकजा मुंडे यांना उमेदवारी न भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या त्यांचीच चर्चा सुरु आहे.

पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्यामुळे समर्थक चांगलेच नाराज झालेले आहे. अनेक ठिकाणी ते आंदोलन करतानाही दिसून येत आहे. तर काहीजण पोस्टरबाजी करुन भाजपला हद्दपार करण्याच्या घोषणा देत आहे. एकाने तर पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्यामुळे किटकनाशकाचे औषधही पिले होते.

अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. औरंगाबादमधील मुंडे समर्थकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यलयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी कराड यांच्या समर्थकांना आधीच याबाबत समजल्यामुळे ते जमा झाले होते आणि त्यांनी हा हल्ला थांबवला आहे.

कराड यांच्या समर्थकांनी तातडीने पोलिसांना बोलवून पंकजा मुंडे समर्थकाला ताब्यात दिले आहे. पंकजा मुंडे यांना डावलल्यामुळे अनेक मुंडे समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे. संध्याकाळच्या सुमारास पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते कराड यांच्या कार्यलयासमोर पोहोचले होते.

तसेच कार्यालयावर कराड समर्थकही तयारीत होते. कराडांविरोधात घोषणाबाजी केल्याने त्यांच्या समर्थकांनी पंकजा मुंडे समर्थकांना मारहाण केली आहे. त्यानंतर पोलिसांनी पंकजा मुंडे समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. सध्या राज्यात भाजप विरुद्ध पंकजा मुंडे समर्थक असा वाद पाहायला मिळत आहे.

दरम्यान, बीडमध्येही दुपारी असेच काहीसे पाहायला मिळाले. इथे मुंडे समर्थकांनी थेट भाजप नेते प्रवीण दरेकरांच्या गाडीचा ताफा अडवला आहे. पण पोलिसांनी त्यांना अडवून ताफ्यासमोरुन बाजूला केलं आहे. बीडच्या धांडे नगरातील परीसरात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या-
‘या’ फार्मची अंडी आणि चिकन खातो धोनी, किंमत आणि खासियत वाचून हैराण व्हाल
भाजप मनसे युतीला पहीले यश! सर्वच्या सर्व जागा जिंकत राष्ट्रवादीची १० वर्षांची सत्ता उलथवली
‘या’ पदार्थांचे सेवन केल्यामुळे गळतात केस, आजपासूनच टाळा नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now