Share

pankaja munde : राजकीय घडामोडींमध्ये पकंजा मुंडेंनीही फोडली डरकाळी! कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश

Pankaja Munde

pankaja munde : महाराष्ट्र मागील काही दिवसांपासून शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरून मोठे रणकंदन माजले होते. न्याय मागण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गट कोर्टापर्यंत गेले. त्यावर कोर्टाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल देत दसरा मेळाव्याला त्यांना परवानगी दिली. तसे पाहता शिवसेनेला दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे. त्याचप्रकारे बीडमध्येही पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची राज्यभरात जोरदार चर्चा असते.

बीडमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत पंकजा मुंडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून ‘दसरा मेळाव्याच्या तयारीला लागा, लवकरच भेटूयात..!’ असे म्हणत एक व्हिडिओ शेअर केला. मागील काही दिवसांपूर्वी दसरा मेळाव्याची जी तयारी सावरगावला चालू आहे. त्याचा व्हिडिओ पण पंकजा मुंडे यांनी शेअर केला होता.

मात्र आताच्या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘कोरोनामुळे अधुरे राहिलेले काम युद्ध पातळीवर सुरू आहे..त्या दिवसाच्या प्रतीक्षेत.. तो दिवस.. कोणता दिवस? स्थळ काय?, निमित्त काय?..तुम्हाला तर माहीतच आहे. मग लागा तयारीला…!’ असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

पुढे बोलताना, पंकजा मुंडे यांनी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या, ‘दसरा सण आपल्या स्वाभिमानाचा, आवडीचा दिवस. आपल्या सर्वांच्या शक्ती भक्तीच्या संगमाचा दिवस.. चला तर लवकरच दसरा मेळाव्यात भेटूया. भगवान भक्तीगडावर..’

अशाप्रकारे कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्यात भेटण्याचे आवाहन व्हिडिओच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी केले. सावरगाव या संत भगवान बाबा यांच्या जन्मगावी पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. याच दसरा मेळाव्याला थोडी वादाची किनार सुद्धा आहे.

भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हयात असताना बीडमधील हा दसरा मेळावा ते भगवानगडावर कायम घेत असत. मात्र त्यांच्या निधनानंतर भगवानगडाचा वापर राजकारणासाठी नको, अशी भूमिका गडावरील लोकांनी घेतली. आणि पंकजा मुंडेंच्या मेळाव्यास विरोध केला.

त्यामुळे हा दसरा मेळावा सावरगावच्या भगवान भक्तीगडावर घ्यायला पंकजा मुंडे यांनी सुरुवात केली. अशाप्रकारे मेळावा ऐतिहासिक असला तरी तो कोणत्या ठिकाणी घ्यावा? याबाबत वाद उपस्थित होणं, ही गोष्ट महाराष्ट्राला नवीन नाही. हेच यातून समोर येते.

महत्वाच्या बातम्या-
uddhav thackeray : शिवसेना महिला पदाधिकाऱ्याला बांगर समर्थकांची शिवीगाळ; खुद्द उद्धव ठाकरेंनी फोन करून दिला धीर
shinde group : शिंदेंनी थेट ठाकरे घरचं फोडलं! थापाच नाही तर बाळासाहेबांच्या जवळची आणखी एक व्यक्तीने मातोश्रीला ठोकला रामराम
supreme court : जो अपात्र ठरणार आहेत, तो बहुमताचा भाग कसा? हे म्हणजे घोड्यापुढे टांगा; शिवसेनेच्या सिंघवींचा जबरदस्त युक्तिवाद

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now