Share

मुंडे बंधू भगिनी एकत्र येण्याच्या मार्गावर; आता धनंजय मुंडेंनी पंकजांना दिले ‘हे’ जबरदस्त रिटर्न गिफ्ट

Pankaja Munde Dhananjay Munde

बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय वैर सार्‍या महाराष्ट्राने पाहिलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर दोघांमधील दरी वाढत गेली. बीड मधली कोणतीही निवडणूक असो ताई विरूद्ध भाऊ असं सामना ठरलेला असतो. मात्र, या बहिण भावात दिलजमाई झाल्याची चर्चा सुरू आहे.

बीडच्या परळी येथील जवाहरलाल शिक्षण संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची देखील या शिक्षण संस्थेत बिनविरोधी सभासद म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पंकज आणि धनंजय मुंडे या भाऊ बहिणीची चर्चा रंगली आहे.

जवाहरलाल शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी सदाशिव आप्पा मुंडे यांचे नातेवाईक बालाजी गिते यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र तो अर्ज त्यांनी माघारी घेतला आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. पंकजा मुंडे बिनविरोधी निवडून आल्या आहेत.

जवाहरलाल एज्युकेशन सोसायटी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासूनची आहे. मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय शत्रुत्व असूनही या सोसायटीवर बिनविरोध निवड झाली कशी, यावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परळी येथील जवाहरलाल एज्युकेशन सोसायटीवर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची एक हाती सत्ता होती.

दरम्यान, नगर जिल्ह्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी नारळी साप्ताहानिमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर दिसले. यावेळी समाजासाठी आपण राजकीय वैर विसरून पुन्हा एकत्र येऊन, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं. तर दुसरीकडे पंकजा मुंडे म्हणाल्या की, गडाबद्दल मी काही वाईट बोलले, तर माझी मान कापून बाजूला ठेवेल.

तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, याप्रसंगी माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे. धनंजय नंतर चार वर्षांनी माझा जन्म झाला. त्याचं काहीतरी कारण असेल. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला दोघ असतील तर काय झालं. आम्ही दोघेही पराक्रमी आहोत‌. आमचं भविष्य काही वेगळं असेल. त्यासाठी काही वेळ वाट पहावी लागेल, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी बहीण भावाच्या एकत्रीकरणाचा नवा संकेत दिला.

महत्त्वाच्या बातम्या
‘मला सलमान खान व्यक्ती विवाह करायचय’; प्राजक माळीने कष्ट केली, कारणही सांगीतले, म्हणाली…
जेवून घ्या रेस्तानाचांनो, महाराष्ट्र सोहळ्यातून आई चिमुकल्यांनी फोन; पोर शोधत राहिली, आई प्रश्नलीच नाही
अर्जुनाच्या झुलाने फिरवला सामना; बाप सचिन तेंडुलकराचा उर भरून आला, म्हणाला…

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now