राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे हे भावा-बहिणीचे राजकीय वैर अनेकदा आपण बघितले असेल. गेल्याच आठवड्यात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात अनेकदा शाब्दिक वाद पाहायला मिळत असतात. (pankaja munde and dhananjay munde at wedding)
असे असताना सध्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोघांनीही एका लग्न समारंभाला हजेरी लावली आहे. अनेकदा त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर लोकांनी त्यांना बघितले आहे, पण या सोहळ्यात ते तब्बल दोन तास सोबत होते.
सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रे आणि शरद सोनहीवरे यांचा विवाह सोहळा लातूरमध्ये पार पडला आहे. या विवाह सोहळ्यात दोघेही एकत्र दिसून आले आहे.
लातूर शहराजवळील एका हॉटेलमध्ये हा लग्न समारंभ पार पडला आहे. कार्निवल हॉटेलमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. धनंजय मुंडे यांच्या भाचीचा विवाह असल्यामुळे धनंजय मुंडे हे सकाळपासूनच तिथे उपस्थित होते. तर दुपारनंतर या सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्या जवळपास दोन तास होत्या.
याआधी अनेकवेळा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एका व्यासापीठावर एकत्र आले आहेत. पण ही भेट थोडी खास होती. कारण यावेळी दोन राजकारणी नाही, तर दोन भाऊ बहिण एका लग्न सोहळ्याला आले होते. त्यांनी तब्बल दोन तास एकमेकांशी संवाद साधला. त्यांचे फोटोही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या लग्न सोहळ्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी दोघांनी एकत्र बसून जेवण केले. मागच्या अनेक दिवसांपासून दोघेही मनमोकळ्यापणाने गप्पा मारताना दिसून आले नव्हते. पण या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने ते दोघेही एकत्र दिसून आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
लतादीदींच्या निधनानंतर बाॅलिवूड शोकसागरात; अनिल कपूर म्हणाले काळीज तुटलं..
विमान देखील उतरू शकतील असे 20 रस्ते मी देशात बांधले – नितीन गडकरी
जेव्हा कोर्टात स्वत: दिलीप कुमार यांनी लढली होती लता मंगेशकर यांची केस; म्हणाले, ‘ताई चिंता नको करू’