महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली. त्यात हरिनाम सप्ताहाला वेगळेच महत्त्व आहे. वैजापूर तालुक्यातील शिरूर येथे मोठा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पार पडला. जगाला हेवा वाटावा एवढ्या हजारोंच्या संख्येने भाविकांचा मेळा या ठिकाणी सप्ताहासाठी जमला होता. (Pangati on 16 acres, lakhs of devotees)
संत शंकरस्वामी महाराज संस्थानच्या वतीने आयोजित या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला भाविकांची मांदियाळी जमली होती. या सप्ताहासाठी १६ एकर जमिनीवर जेवणाच्या पंगती उठल्या. एवढ्या मोठ्या संख्येने जेवणाच्या पंगती या सप्ताहात उठल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय बनला आहे.
एक लाखांहून अधिक भाविक या सप्ताहासाठी उपस्थित असल्याचे समजते. महाप्रसादासाठी १ हजार १११ किलो बुंदी आणि हरभऱ्याच्या घुगऱ्यांचा प्रसाद लाखो भाविकांसाठी तयार करण्यात आला होता.
सलग ८ दिवस २५ चुलींवर वर बुंदी बनवण्याचे काम २४ तास सुरू होते. यावरूनच महाप्रसाद किती लोकांसाठी बनवण्यात येत असावा याचा अंदाज येतो. या महाप्रसादाचा लाभ उपस्थित सर्व भाविकांनी घेतला.
हजारोंच्या संख्येने जवळजवळ १६ एकरमध्ये भाविकांच्या जेवणाच्या पंगती बसल्या होत्या. तब्बल ६४ ट्रॅक्टर्सच्या मदतीने हा महाप्रसाद भाविकांना वाटण्याचे काम सुरू होते. वैजापूरच्या शिरूर तालुक्यातील संत शंकरस्वामी महाराज संस्थांनचा हा अखंड हरिनाम सप्ताह २१ वर्षांपासून सुरू असल्याची माहिती संस्थानाकडून देण्यात आली.
सर्व भेद बाजूला सारून हजारोंच्या संख्येने भाविकांच्या जेवणाच्या पंगती उठल्या. अखंड हरिनामाचा जप एकमुखाने या सोहळ्यात झाला. या हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या भव्य आयोजनाची राज्यभर चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘रेड’मधील अजय देवगण स्टाईलने आयकर विभागाची छापेमारी, जालन्यातून ३९० कोटींची मालमत्ता जप्त
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यातून काढण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी थोपटले दंड, घेतला मोठा निर्णय
Sharad Pawar : शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला, म्हणाले, वादविवाद वाढविणे योग्य नाही, मी बाहेर पडल्यावर…