Share

नताशासोबतचा फोटो शेअर करत पांड्याने दिले मनाला भिडणारे कॅप्शन; म्हणाला, हे आपल्या मेहनतीचे..

IPL 2022 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पराभव करत विजेतेपद पटकावले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) या सिजनमध्ये चमकदार कामगिरी केली. त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. सामन्यानंतर हार्दिकने पत्नी नताशा स्टॅनवोकीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्याने एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. हार्दिक आणि नताशाचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला असून त्यावर प्रतिक्रियाही येत आहेत.

अंतिम सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत १३० धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १८.१ षटकांत लक्ष्य गाठले आणि सामना ७ गडी राखून जिंकला. हार्दिकने गुजरातसाठी चांगली कामगिरी केली. संघाचा चॅम्पियन बनल्यानंतर पांड्याने पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यासाठी त्याने कॅप्शन लिहिले की, ‘चॅम्पियन. हे आपल्या मेहनतीचे आहे. सर्व खेळाडू, कर्मचारी आणि चाहत्यांचे अभिनंदन. गुजरात टायटन्स’

या सिजनमध्ये पंड्याने दमदार कामगिरी केली हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्याने १५ सामन्यात ४८७ धावा केल्या. हार्दिकने या सिजनमध्ये ४ अर्धशतके झळकावली. गोलंदाजीतही त्याने कमाल दाखवली. त्याने ८ विकेट्सही घेतल्या आहेत. पंड्याने अंतिम फेरीतही अप्रतिम कामगिरी केली. ३४ धावा करण्यासोबतच त्याने ३ बळीही घेतले. या सिजनमध्ये पांड्याने गोलंदाजीत १७ धावांत ३ बळी घेतले होते.

https://twitter.com/Ashok94540994/status/1530978490887319552?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1530978490887319552%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-watch-viral-video-natasa-stankovic-gets-emotional-after-meeting-husband-hardik-pandya-post-gt-win-ipl-title-4286714.html

T२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर टीकाकारांच्या निशाण्यावर आलेल्या हार्दिक पांड्यासाठी ही ट्रॉफी खूप महत्त्वाची आहे. टीम इंडियातून वगळल्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सनेही कायम ठेवले नाही. आता दमदार कामगिरी करत त्याने संघाला चॅम्पियन बनवल्यावर त्याची पत्नी नताशा त्याला मैदानात मिठी मारत भावूक झाली.

संघाच्या विजयानंतर मैदानात पोहोचलेल्या नताशाला हार्दिक पांड्याने मिठी मारली. नताशा खूपच भावूक दिसत होती. बराच वेळ हार्दिक काहीतरी बोलत तिला सांभाळताना दिसत होता. काही वेळाने ती हसत हार्दिकच्या गालावर हात ठेवून प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. या सुंदर क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
IPL मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कार्तिकमुळेच RCB चे ट्रॉफीचे स्वप्न भंगले, ‘ती’ एक चूक अन् गमावला सामना
फोन वाजला अन् रजत पाटीदारने स्वत:च्या लग्नाची तयारी सोडून थेट गाठली IPL, वाचा भन्नाट किस्सा
पुर्ण IPL मध्ये चांगली कामगिरी करणारी लखनऊ नेमकं कुठे चुकली? केएल राहुलकडून काय चुकलं?
पोस्टमास्तरने फिक्स डिपॉझिटच्या नावाखाली जमा केले एक कोटी, IPL मध्ये लावला सट्टा; झाली अटक

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now