Share

Death : ब्रेकिंग! पणन महासंचालक घोरपडेंचा मृतदेह दोन दिवसांनी नीरा नदीपात्रात सापडला; हत्येचं गुढ कायम

shashikant ghorpade

Death : राज्याचे पणन महासंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे दोन दिवसापासून संशयास्पदरीत्या बेपत्ता होते. गृह विभागाने याची तातडीने दखल घेत शोधकार्य सुरू केले. शशिकांत घोरपडे यांचा दोन दिवसांनंतर शोध लागला असून एनडीआरएफच्या जवानांना नीरा नदीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. या धक्कादायक घटनेनंतर राज्यभर एकच खळबळ उडाली. राज्याचा एवढा महत्त्वपूर्ण अधिकारी अचानक बेपत्ता होतो. आणि त्याचा मृतदेह नदीत सापडतो, या धक्कादायक घटनेमुळे याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहे.

शशिकांत घोरपडे दोन दिवसांपूर्वी पुण्याहून साताऱ्याकडे जाण्यासाठी निघाले होते. वाटेत मध्येच ते बेपत्ता झाले. मागील २४ तासांपासून पोलीस यंत्रणा त्यांचा शोध घेत होती. नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय यंत्रणेला आल्याने त्यांनी एनडीआरएफ जवानांच्या मदतीने नदीपात्रालगत देखील घोरपडे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

साताऱ्याकडे जाण्यासाठी निघालेल्या घोरपडेंनी मध्येच गाडी थांबवली. ते गाडीतून उतरले व एका दिशेने पुढे चालत गेले. त्यानंतर मात्र ते परत आले नाहीत. एका ठिकाणी पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये ते चालत कुठेतरी जात असल्याचेही आढळून आले होते. त्याचा धागा दोरा पकडत पोलीस यंत्रणा शोध घेत होती.

आता मात्र नीरा नदीमध्ये शशिकांत घोरपडे या अधिकाऱ्याचा मृतदेह एनडीआरएफ जवानांना सापडला. त्यामुळे घोरपडे यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली? याबाबत पोलीस यंत्रणेपुढे मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. येत्या काळात गृहविभाग या प्रकरणाची कसून चौकशी करणार असून या मृत्यू मागचे खरे कारण शोधून काढण्यास प्रयत्नशील राहणार असल्याचे बोलले जाते.

घोरपडे यांचे शेवटचे लोकेशन शिरवळ असे दाखवण्यात आले होते. त्यांच्या नातेवाईकांनी शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. दोन दिवसानंतर शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नदीत सापडल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नदीपात्रालगतच्या एका हॉटेलमधून एक व्यक्ती नदी पात्राकडे चालत जात असताना दिसून आली. मात्र कोणत्या व्यक्तीने नदीपात्रात उडी मारली आहे? याबाबत स्पष्टता होत नव्हती. पोलिसांनी मात्र याप्रकरणी शशिकांत घोरपडे यांचा शोध घेण्याची कार्य जोमाने सुरूच ठेवले होते. अखेरीस घोरपडे यांचा मृतदेह नदीपात्रात सापडला असून या मृत्यूचे गुढ मात्र सध्या कायम आहे.

महत्वाच्या बातम्या-
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
eknath khadse : …अन् खडसे पोलीस स्टेशनसमोरच झोपले, 16 तासांपासून आंदोलन सुरूच; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
uddhav thackeray : शिंदेंना चारी मुंड्या चीत करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी मैदानात; आखला ‘हा’ स्पेशल गेमप्लान

ताज्या बातम्या इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now