Share

सीमेवर देशाचे रक्षण करणारा महाराष्ट्राचा सुपूत्र शहीद; मृत्यूमागील धक्कादायक कारण आले समोर

एक दु: खत वृत्त समोर आली आहे. सीमेवर कर्तव्य बजावताना सर्पदंशाने ‘बीएसएफ’च्या जवानाला वीरमरण आले आहे. यामुळे पालघर जिल्ह्यासह राज्यावर शोकळला पसरली आहे. महेश रामा फडवळे असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे.  महेश यांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

वाचा नेमकं घडलं काय..? महेश रामा फडवळे हे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे गावचे सुपुत्र होते. ते पंजाब प्रांतातील भारत-पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत होते. बीएसएफच्या बीएन मुख्यालय ५८ माधोपूर येथे कर्तव्य बजावत असताना त्यांच्या डाव्या हाताला साप चावला होता.

५ जून रोजी ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. महेश रामा पडवले यांना साप चावल्याचे लक्षात येताच त्यांना पठाणकोटच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवण्यात आले. तिथे त्यांच्या योग्य पद्धतीने उपचार देखील करण्यात आले. मात्र उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तसेच बाकी जवानांनी महेश पडवले यांच्या पत्नी परमिला फडवळे यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. महेश फडवळे यांना साप चावल्याच समजताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबियांसह संपूर्ण जिल्ह्यावर दु: खाचा डोंगर कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश रामा फडवळे यांचे पार्थिव काल रात्री मुंबईत आल्यानंतर आज दुपारी त्यांच्यावर कऱ्हे या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. साश्रू नयनांनी संपूर्ण जिल्ह्याने महेश रामा पडवले यांना अखेरचा निरोप दिला.

दरम्यान, मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आले नसून शवविच्छेदन अहवालातून निश्चित करण्यात येईल. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पश्चात वडील रामा फडवळे, आई रख्मी फडवळे, पत्नी परमिला फडवळे आणि मुलगी नॅन्सी फडवळे असा छोटासा परिवार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now