T-20 World Cup : बांग्लादेशने टी-२० विश्वचषक २०२२ च्या सामन्यात भारतासमोर गुडघे टेकले आहेत. अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात भारताने बांग्लादेशचा (DLS पद्धतीने) ५ धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने बांग्लादेशला १८५ धावांचे लक्ष्य दिले. पण त्यानंतर पाऊस आला आणि बांग्लादेशला १६ षटकांत विजयासाठी १५१ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.
प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संघ १६ षटकांत ६ गडी बाद १४५ धावाच करू शकला. त्यामुळे भारताने ५ धावांनी (DLS पद्धतीने) हा सामना जिंकला. टीम इंडिया आता ६ गुणांसह उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
अॅडलेड ओव्हलवर विराट कोहलीची धमाकेदार कामगिरी आजच्या सामन्यातही पाहायला मिळाली. त्याच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने बुधवारी बांग्लादेशविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यात ६ बाद १८४ धावा केल्या. कोहलीने ४४ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ६४ धावांची खेळी केली.
त्याच्या शानदार फटकेबाजीला बांग्लादेशच्या एकाही गोलंदाजाकडे उत्तर नव्हते. येथील खेळपट्टी पर्थपेक्षा संथ होती. पॉवरप्लेनंतर बांग्लादेशचे गोलंदाज दडपणाखाली आले. या सामन्यात केएल राहुल ३१ चेंडूत ५० धावा करून फॉर्ममध्ये परतला.
कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी राहुलसोबत ६७ आणि तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसोबत ३८ धावांची भागीदारी केली. आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या यादवने १५ चेंडूत ३० धावा केल्या. तस्किन अहमदच्या चेंडूवर पहिल्याच षटकात भारतीय कर्णधार रोहित शर्माला जीवदान मिळाले, पण त्याचा फायदा त्याला उठवता आला नाही आणि ८ चेंडूंत २ धावा करून तो बाद झाला.
त्यामूळे भारतीय फलंदाजी दबावाखाली आली होती. पण त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने सलामीवीर केएल राहुलसोबत अर्धशतकीय भागीदारी केली. या दोघांच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने १८४ धावा बनवल्या. पण बांग्लादेशला हे लक्ष गाठता आले नाही.
बांग्लादेशवर विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया ग्रुप २ मध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. आता भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी झिम्बाब्वेविरुद्धच्या गट २ मधील शेवटच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. पण भारतीय संघ जर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाला तर भारतीय संघाला पुढच्या फेरीत जाण्यासाठी पाकिस्तानच्या सामन्यांवर लक्ष ठेवावे लागेल. पाकिस्तानचे दोन सामने शिल्लक आहेत.
पाकिस्तानचा एक सामना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आहे, तर दुसरा बांग्लादेशविरुद्ध आहे. जर पाकिस्तानने आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला. सोबतच बांग्लादेशने पाकिस्तानविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवला तर भारताला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचता येणार नाही. भारताला रोखण्यासाठी पाकिस्तान ही चाल खेळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
KL Rahul : खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहूलची संघातून होणार हकालपट्टी? द्रविड म्हणाला…
T20 World Cup : … म्हणून न्युझीलंड दौऱ्यावर विराट-रोहितला विश्रांती देण्यात आली; निवडकर्त्यांचा केला मोठा खुलासा
shivsena : सत्ता गेली तरी पक्षाला लागलेली गळती थांबेणा; मातोश्रीचा निष्ठावंत नेता शिंदे गटात सामील
shivsena : राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार कोसळणार; सुप्रीम कोर्टातील घडामोडीनंतर घटनातज्ञांनी स्पष्टच सांगीतलं






