कोहलीसाठी भावूक झाला पाकिस्तानचा मोहम्मद आमिर; एका ट्वीटनं जिंकली लाखोंची मनं!

भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा विराट कोहलीने राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक भावनिक पोस्ट शेअर करून कसोटी कर्णधारपद सोडले आहे.

‘भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा युवा पिढीसाठी प्रेरणास्रोत असल्याचे, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने म्हटले आहे. कोहलीने कसोटीचे कर्णधारपद सोडल्यानंतर आमिरने हे ट्वीट केले आहे. शनिवारी विराटने सर्वांनाच धक्का देत भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली.

यावर भारताचा मर्यादीत षटकांचा कर्णधार रोहित शर्मानेही एक इन्स्टाग्राम पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहितने इन्स्टा पोस्टमध्ये विराट आणि त्याचा कसोटी सामना खेळतानाचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे, ‘हे धक्कादायक आहे. पण भारतीय कसोटी संघाचा कर्णधारपद उत्तम रित्या सांभाळल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा!’ तसेच भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यानं विराटच्या या निर्णयावर मोठं विधान केलं आहे.

कर्णधारपदावर कोणाचा जन्मसिद्ध हक्क नसतो, वेळ आल्यावर ती जबाबदारी दुसऱ्या खेळाडूकडे सोपवावी लागते, असे गंभीर म्हणाला. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात गंभीर म्हणाला, ”कर्णधारपदावर कोणाचा जन्मसिद्ध हक्क नसतो.

तसेच महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूनंही कर्णधारपदाची बॅटन विराट कोहलीकडे सुपूर्द केली होती. तोही कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला होता. धोनीनं तर तीन आयसीसी स्पर्धा आणि चार आयपीएल ट्रॉफी उंचावल्या आहेत. त्यामुळे आता कोहलीनं धावा बनवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं. ते जास्त महत्त्वाचे आहे,’ असे गंभीर म्हणाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
करोडोंची फसवणूक करणारा एसटीतून उतरून पोलीसांना शरण आला; म्हणाला होय..मीच विशाल फटे
सलमानवर सतत टीका करणाऱ्या अभिनेत्याचे सपशेल लोटांगन; म्हणाला तो माझा शत्रू नाही, तो तर..
जुही चावलावर फिदा होता आमिर खानचा ‘हा’ नातेवाईक; सेटवरच केला होता प्रपोज
सलमानवर सतत टीका करणाऱ्या अभिनेत्याचे सपशेल लोटांगन; म्हणाला तो माझा शत्रू नाही, तो तर..