Share

पाकिस्तानचा डाव फसला! दिल्लीला निघालेले ४ दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त

पाकिस्तान आपल्या शत्रू देशांना उध्वस्त करण्यासाठी नेहमी कोणते ना कोणते कट रचत असताना दिसतो. असाच एक कट नुकताच पाकिस्तानने दिल्लीला उद्ध्वस्त करण्यासाठी रचला होता. मात्र त्यांचा हा डाव पोलिसांनी उधळून टाकला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या करनालमधून ४ दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या दहशतवाद्यांकडे पोलिसांना ३१ कारतूस आणि ३ IED सापडले आहे. आता या ४ दहशतवाद्यांना CIA स्टाफकडे घेऊन जाण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे दहशतवादी पंजाबमधून दिल्लीला चालले होते. मात्र यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळताच या ४ दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांची नावे, गुरप्रीत सिंह, अमनदीप सिंह, परमिंदर सिंह और भूपिंदर सिंह अशी आहेत. या चार दहशतवाद्यांचा पाकिस्तानी दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सध्या पोलीस या दहशतवाद्यांची कसून चौकशी करत आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती यांच्याकडून मिळालेली नाही. पोलिसांना दहशतवाद्यांच्या गाडीमध्ये बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी सामग्री मिळाली आहे. यामुळे या दहशतवाद्यांनी मोठा डाव रचल्याचा अंदाज पोलीस सध्या वर्तवित आहेत.

दरम्यान पंजाबमध्ये दहशतवादी सापडल्यामुळे या भागातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. यापूर्वी देखील दिल्लीमध्ये हल्ला घडवून आणण्याचा कट पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी रचला होता. आता देखील या दहशतवाद्यांचा असाच काही प्लॅन असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. सध्या पंजाबमध्ये सापडलेल्या या दहशतवाद्यांची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या
राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना वाद पेटला; अमरावतीमध्ये राणा समर्थकांकडून शिवसेना भवनाची तोडफोड
मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी राज ठाकरेंना शिवसैनिकांचाच पाठिंबा; शिवसेनेत दुफळी?
‘राज ठाकरे हात जोडून माफी मागा, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही’, भाजप खासदाराचा इशारा
अवघ्या २२ व्या वर्षी हजारो कोटींची कंपनी उभी केली; पुण्याची आर्या तावरे झळकली फोर्ब्जच्या यादीत

ताज्या बातम्या क्राईम राज्य

Join WhatsApp

Join Now