दहशतवादी संघटनेविरोधात कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर लक्ष ठेवणारी एक संस्था आहे. त्या संस्थेचे नाव फायनांशियल अँक्शन टास्क फोर्स असे आहे.(Pakistan’s game over?)
या संस्थेने पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांच्या ग्रे-लिस्टमध्ये ठेवलं आहे. तुमच्या आर्थिक प्रणालीद्वारे असलेल्या त्रुटी लवकरात लवकर दूर करा, अन्यथा काळ्या यादीत टाकू, असा इशारा एफएटीएफने पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तान जून २०१८ पासून एफएटीएफच्या ग्रे यादीत आहे.
याचा अर्थ पाकिस्तान मनी लॉन्ड्रिंग करण्यात असमर्थ ठरला असा होतो. पाकिस्तान अपयशी ठरल्याने दहशतवाद्यांना आर्थिक मदत मिळाली. दहशतवादी संघटना आणि त्यांचे पुरस्कर्ते यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानला ऑक्टोबर २०१९ पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
मात्र पाकिस्तान यातही अपयशी ठरले. त्यामुळे आता अमेरिकेने आक्रमक कृती घेतली आहे. पाकिस्तानला दहशतवादाचा प्रायोजक देश म्हणून घोषित करण्याचं आवाहन अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियाचे खासदार स्कॉट पेरी यांनी केलं आहे. यासाठी त्यांनी अमेरिकेच्या संसदेत विधायकही मांडले आहे. हे विधायक मंजूर झाल्यास पाकिस्तानला परदेशातून मदत मिळणार नाही.
संरक्षण, निर्यात आणि विक्री याच्यासह विविध निर्बंधही पाकिस्तानवर लादले जातील. पाकिस्तानचा खेळ जवळपास संपलाच आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानला दहशदवाद आणि द्वेष पसरवण्यासाठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
अमेरिकन खासदाराने मांडलेले विधायक मंजूर झाल्यास पाकिस्तानच्या अडचणी अधिक वाढतील. सध्या काळ्या यादीत इराण, सिरीया, क्युबा आणि उत्तर कोरियाचे चार देश आहेत. दहशतवाद्यांचे पुरस्कर्ते म्हणून या देशांचा समावेश काळ्या यादीत करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
२४ वर्षीय पायलट महाश्वेताची कौतूकास्पद कामगिरी, युक्रेनमधून ८०० भारतीय विद्यार्थ्यांना आणले भारतात
मुलगा मुख्यमंत्र्यांना पाडून झाला आमदार, तरीही सफाई कामगार आई पोहोचली कामावर; म्हणाली..