दहशतवादी कारवायांत सहभाग व दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपांखाली दोषी ठरविण्यात आलेला जम्मू-काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिक याला आज एनआयएच्या कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्याला दोषी ठरवल्यानंतर आता पाकिस्तानचं पित्त खवळलं आहे.
जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासिन मलिक याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी आज कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. राष्ट्रीय तपास पथकाच्या (NIA) विशेष कोर्टानं 19 मे रोजी यासिन मलिक याला बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं.
या निकालाच्या पार्श्वभूमीवर पटियाला हाऊस कोर्टात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. आज सुनावणी सुरु होताच एनआयएनं दोषी मलिकच्या फाशीची मागणी केली होती. सर्व पक्षांचा शेवटचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं याप्रकरणाचा निर्णय दुपारी साडेतीन वाजेपर्यंत राखीव ठेवला होता. पण कोर्टानं अखेर जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं.
यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आल्यामुळे आता पाकिस्तानमधून विविध प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिकी आणि अब्दुल बाशिद यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे.
शाहिद आफ्रिकी यांनी ट्विट केले आहे की, भारताकडून मानवाधिकारांचे हणन केलं जात आहे. या विरोधात आपण संयुक्त राष्ट्रांमध्ये धाव घेणार आहे. जम्मू काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी यासिन मलिक काम करत होता. भारताने या प्रकरणी मानवाधिकारांचे उल्लंघन केलं आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने या प्रकरणात आता हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्याने केली आहे.
तर, पाकिस्तानचे पूर्व राजदूत अब्दुल बाशिद यांनीही भारतीय न्यायव्यवथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, कोर्टात सुनावणी होत असताना दिल्लीसह काश्मीरमध्ये देखील सुरक्षितेत वाढ करण्यात आली होती. आज यासिन मलिक यांच्या समर्थनार्थ जम्मू-काश्मीरमध्ये त्याचे समर्थक रस्त्यावर आले होते.
पाकिस्तानातील अनेक मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली. हा न्यायालयीन दहशतवाद आहे, असं पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी म्हटलं आहे. आता यासिन मलिकला फाशी झाल्यानंतर संतप्त पाकिस्तान आणखी कोणतं पाऊल उचलणार हे पाहावं लागेल.