पंजाबी गायक सिद्धू मूसवाला (Sidhu Musawala) यांची २९ मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून चाहते रोज त्यांच्या खास शैलीत त्याची आठवण काढत आहेत. नुकताच ११ जून रोजी सिद्धू मुसेवालाचा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने देशासह विदेशातील चाहत्यांनी त्याची आठवण काढली.(Sidhu Musawala, Punjabi Singer, Video, Social Media)
टाइम्स स्क्वेअरने सिद्धू मुसेवाला यांच्या वाढदिवसानिमित्त खास आठवण काढली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता पाकिस्तानातील ट्रकचालकांनीही सिद्धू मुसेवाला यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते पाहून तुमचेही डोळे ओले होतील. जेव्हापासून लोकांनी आपला लाडका पंजाबी गायक सिद्धू मूसवाला गमावला आहे, तेव्हापासून ते या दुःखातून बाहेर पडू शकलेले नाहीत.
https://twitter.com/iffiViews/status/1536369112321912835?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1536369112321912835%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.bollywoodlife.com%2Fhi%2Fnews-gossip%2Fsidhu-moosewala-fan-from-pakistani-make-a-poster-of-singer-behind-his-trucks-lovely-tribute-video-viral-2102551%2F
https://twitter.com/Rizwanmarwat331/status/1536526459837288450?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1536526459837288450%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.bollywoodlife.com%2Fhi%2Fnews-gossip%2Fsidhu-moosewala-fan-from-pakistani-make-a-poster-of-singer-behind-his-trucks-lovely-tribute-video-viral-2102551%2F
सिद्धू मुसेवालाच्या जाण्यानंतर त्याचे चाहते त्याला खूप मिस करत आहेत. असे काही चाहते आपल्या शेजारील देश पाकिस्तानमध्येही आहेत. त्यांनी सिद्धू मुसेवाला यांची आठवण त्यांच्याच शैलीत केली आहे. कुणी ट्रकवर त्याचे पोस्टर लावले, तर कुणी बाईकवर फोटो लावले. ट्रकच्या पोस्टरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या ट्रकच्या मागे सिद्धू मूसवालाचे पोस्टर बनवत आहे. यानंतर तो ते साफ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. हे पाहून चाहते भावूक होत आहेत. चला तर मग पाहूया या चाहत्याचे प्रेम आणि इतर लोक यावर काय बोलतात.
पंजाबमध्ये २९ मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेशी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी त्यांची आठवण काढली. त्यात हनी सिंगपासून अनेक बड्या गायकांच्या नावांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ शहरातून रचला सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा प्लॅन; पोलिसांच्या हाती आले मोठे पुरावे, दोन जण ताब्यात
अमित शहांनी घेतली सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबीयांची भेट, भावूक झाले सिद्धूचे वडील, म्हणाले..
सुशांत, सिद्धार्थ शुक्ला आणि सिद्धू मुसेवाला; ३ वर्षे, ३ मृत्यु आणि न सुटलेले हे प्रश्न, चाहतेही झालेत हैराण
सिद्धू मुसेवालाला काही मिनीटे आधीच झाला होता मृत्युचा आभास, कारमधील मित्राने सांगितला घटनाक्रम