Share

हार्दिकचे मसल्स पक्षासारखे पातळ, त्याच्यात गोलंदाजी करण्यासाठी जीव नाही, पाकिस्तानी गोलंदाजाचे बेताल वक्तव्य

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आयपीएलच्या या सीजनमध्ये जोरदार पुनरागमन करून सर्वांना प्रभावित केले. मात्र 5 सामने खेळल्यानंतर पंड्याला पुन्हा एकदा फिटनेसमुळे संघाच्या सहाव्या सामन्यातून बाहेर बसावे लागले. वारंवार त्याच्या दुखापतीमुळे भारतीय चाहते संतापले आहेत. तसेच यावर आता पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तरनेही भाष्य केले आहे.(Pakistani bowler’s absurd statement)

पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) वारंवार होणाऱ्या दुखापतींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो म्हणतो की, हार्दिकच्या स्नायूंमध्ये सतत गोलंदाजी करण्यासाठी पुरेसा जीव नाही, त्यामुळे त्याला वारंवार दुखापत होत आहे. रावळपिंडी एक्स्प्रेसनेही हार्दिकला आधीच इशारा दिला होता.

See the source image

एका वृतसंस्थेशी बोलताना, 46 वर्षीय शोएब अख्तर म्हणाला, मी जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या दोघांनाही सांगितले आहे की, त्यांचे पक्ष्यांसारखे पातळ स्नायू आहेत. त्याच्या पाठीचे स्नायू मजबूत नाहीत. माझे पाठीचे स्नायू आणि खांद्याचे स्नायू आजही प्रचंड मजबूत आहेत. तो पुढे म्हणाला की, मी जेव्हा हार्दिकला दुबईत भेटलो तेव्हा मी त्याच्या कमरेला स्पर्श केला. तेथे स्नायू होते, परंतु ते खूप पातळ होते, म्हणून मी त्याला इशारा दिला की तो जखमी होऊ शकतो, पण तो म्हणाला की त्याने खूप क्रिकेट खेळले आहे आणि त्या सामन्यात त्याला दुखापत झाली.

त्याचबरोबर गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की, हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठा ब्रँड आहे. जर त्याचा फिटनेस योग्य असेल तर मला खात्री आहे की हा अष्टपैलू खेळाडू भविष्यात T20 फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार होऊ शकतो. त्याने आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्व क्षमतेचे भक्कम उदाहरण ठेवले आहे.

दुखापतीमुळे हार्दिक पंड्या रविवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागी अनुभवी लेगस्पिनर राशिद खानने गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व केले. हार्दिक हा कंबरेच्या दुखापतीतून जात आहे आणि त्यामुळेच तो या सामन्याचा भाग होऊ शकला नाही. तथापि, इंडियन प्रीमियर लीगच्या सध्याच्या आवृत्तीत पांड्याने त्याच्या कर्णधारपदाने खूप प्रभावित केले आहे. याशिवाय, त्याने आपल्या चमकदार फलंदाजी आणि मजबूत गोलंदाजीसाठी बरीच प्रशंसा मिळवली आहे.

महत्वाच्या बातम्या-
मी या आयपीएलचा वाट पाहत आहे कारण.., पहिल्यांदाच कर्णधार बनलेल्या हार्दिक पंड्याचे मोठे वक्तव्य
हार्दिक पांड्यामुळे गेली या चाहत्याची नोकरी? आपल्या कृतीवर आता होत असेल पश्चाताप
हार्दिक रॉक्स! रॉकेटच्या वेगाने बॉल फेकून संजूला केलं आऊट, स्टंपचे झाले तुकडे, थांबवावा लागला सामना, पहा व्हिडीओ
विकेट पडली हार्दिकची अन् नजरा खिळल्या पत्नी नताशावर, क्रिकेटच्या मैदानातील तो Video झाला व्हायरल

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now