pakistan win against southa africa then india in tension | टी २० वर्ल्डकप २०२२ चा ३६ वा सामना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. सिडनी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ८ विकेट्स गमावून १८६ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला दिलेले लक्ष्य गाठण्यात अपयश आले. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान ३४ धावांनी विजयी झाला. इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांच्याशिवाय पाकिस्तान संघाचा कोणताही खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करू शकला नाही.
या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला चांगली सुरुवात करता आली नाही. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम संघासाठी केवळ १० धावांची भर घालू शकले. मोहम्मद हरिस आणि मोहम्मद नवाज प्रत्येकी २८ धावा करून बाद झाले, तर शान मसूदही लवकर बाद झाला.
या खेळीदरम्यान मसूदला केवळ २ धावा करता आल्या. संघाचे सलामीचे फलंदाज फारसे काही करू शकले नाहीत, तर इफ्तिखार आणि शादाब यांनी झंझावाती खेळी खेळताना अनुक्रमे ५१ आणि ५२ धावा केल्या. या दोन फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानला ८ विकेट्स गमावून १८५ धावा करता आल्या.
१८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला कर्णधार टेम्बा बावुमाने चांगली सुरुवात केली, मात्र तो केवळ ३६ धावा करून बाद झाला. त्याचवेळी स्टार फलंदाज क्विंटन डी कॉक खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. रिले रॉसनही ६ चेंडूत केवळ ७ धावा करू शकला, तर एडन मार्कर्मही चेंडूवर २० धावा करुन बाद झाला.
या कामगिरीमुळे संघाला ९ षटकांत केवळ ६९ धावा करता आल्या, मात्र पावसामुळे सामना थांबवावा लागला. सामना थांबण्यापूर्वी पाकिस्तान संघाचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी शानदार गोलंदाजी करताना दिसला. संघासाठी दोन षटकांत गोलंदाजी करताना त्याने दोन बळी घेतले. त्याचवेळी, पाऊस थांबल्यानंतर नियमांमध्ये बदल केल्यामुळे सामना १४ षटकांचा करण्यात आला आणि दक्षिण आफ्रिकेला १४२ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
पाऊस थांबल्यानंतर मैदानात परतल्यानंतरही दक्षिण आफ्रिका काही चांगली कामगिरी करु शकली नाही. सामना सुरु झाल्यानंतर पहिली विकेट हेन्रिक क्लासेनची पडली, ज्याने संघासाठी अवघ्या १५ धावा केल्या. त्याच्याशिवाय वेन पारनेल हाही ८ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ट्रिस्टन स्टब्सलाही १८ चेंडूत १८ धावा करता आल्या.
दक्षिण आफ्रिकेला १४ षटकांत ९ विकेट्स गमावून केवळ १०५ धावा करता आल्या. परिणामी पाकिस्तानने ३४ धावांनी विजय मिळवला आहे. पण पाकिस्तानचा हा विजय भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. कारण पाकिस्तानचा संघ सेमी फायनलमध्ये येण्याची शक्यता वाढली आहे. पाकिस्तानसाठी हा संघ करो या मरोचा होता. पण आता त्यांनी विजय मिळवल्याने ते सेमी फायनलमध्ये जाण्याची शक्यता वाढली आहे.
आता भारताचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध असणार आहे. हा सामना भारतीय संघाला कुठल्याही परिस्थिती जिंकणे गरजेचे आहे. भारताना हा सामना जिंकला, तर भारत सेमी फायनलमध्ये जाईल हे निश्चित होईल. पण जर भारताचा पराभव झाला, तर भारताच्याही अडचणी वाढणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये भारताचे ६ गुण, दक्षिण आफ्रिकेचे ५ गुण आणि पाकिस्तानचे ४ गुण आहे. तसेच तिन्ही संघाचे १-१ सामने अजून बाकी आहे.
महत्वाच्या बातम्या-
Rohit Sharma: अनेकवेळा संधी देऊनही ‘हा’ दिग्गज खेळाडू होतोय फ्लॉप, लवकरच रोहित संघातून काढणार बाहेर?
Rahul Dravid: त्याने बुमराहची कमतरता भासू दिली नाही, राहुल द्रविडने ‘या’ गोलंदाजाला सांगितले भारताचे भविष्य
Team India : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चिटींग केली? ‘या’ कारणामुळे होत आहेत गंभीर आरोप