Pakistan : बॅगा भरा अन् कराचीला निघा; झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ झाला तुफान ट्रोल

pakistan trolls after losing match  | गुरुवारी पाकिस्तान-झिम्बाब्वेमध्ये टी २० वर्ल्डकपचा सामना झाला. हा सामना खुपच थरारक होता. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला १ धावेने पराभव स्वीकारावा लागला आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने थरारक विजय मिळवला आहे. पाकिस्तानचा हा वर्ल्डकपमध्ये सलग दुसरा पराभव होता.

पाकिस्तान झिम्बाब्वेने दिलेल्या १३१ धावांचा पाठलाग करत होता. पण पाकिस्तानला फक्त १२९ धावाच करता आल्या. पाकिस्तानमध्ये जन्मलेला पण झिम्बाब्वेचा गोलंदाज सिकंदर रझाने खुपच चांगली कामगिरी केली. त्याने २५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

झिम्बाब्वेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पाकिस्तानच्या संघाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. संघाच्या खराब कामगिरी नंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी ट्रोल केले आहे. पाकिस्तानच्या संघाने एअरपोर्टला जाण्यासाठी क्वालिफाय केले आहे, असे म्हणत काहींनी पाकिस्तानच्या संघाचा खिल्ली उडवली आहे.

एअरपोर्टसाठी क्वालिफाय म्हणजेच पाकिस्तान टी २० वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे, असे चाहत्यांनी म्हटले आहे. पण अजूनही पाकिस्तान स्पर्धेत आहे. पण ती संधी दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. पण त्याआधीच सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहे.

एकाने म्हटले की पाकिस्तान कराची एअरपोर्टसाठी क्वालिफाय झाली आहे. तर दुसऱ्या एकाने बजरंगी भाईजान या चित्रपटातला फोटो शेअर केला असून त्यामध्ये चल मुन्नी तुझे पाकिस्तान छोडकर आता हूँ असे लिहिलेले आहे. त्यावर मुन्नीच्या जागी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा फोटो लावलेला आहे. तर सलमानच्या जागी झिम्बाब्वेच्या कर्णधाराचा फोटो आहे.

https://twitter.com/sara_pirzadaa/status/1585649594297466881?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1585649594297466881%7Ctwgr%5Ed5b36f9de8a81e7cd47dd34f61a49d02001578f9%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fsports%2Fcricket%2Ft20worldcup%2Fnews%2Ft20-world-cup-pak-vs-zim-pakistan-qualify-for-karachi-airport-fans-takes-a-dig-at-babar-azam-team%2Farticleshow%2F95128978.cms

अशात एकाने बाबर आझमचा एक ड्रेसिंग रुममधला फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये वर कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, यामध्ये कोणाचाही दोष नाही, पटकन आपल्या बॅगा भरा अन् कराची एअरपोर्टसाठी निघा. सध्या सोशल मीडियावर अशाप्रकारचे खुप मीम्स व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
Virat Kohli : क्रिकेटमधले सर्वोत्तम खेळाडू कोण? विराटने घेतले ‘या’ दोन खेळाडूंचे नाव; वाचून शॉक व्हाल
eknath shinde : ‘महाराष्ट्र गुजरातमध्ये विलीन करा’; ब्राम्हण महासंघाने का केली अशी मागणी? जाणून घ्या..
Bachchu Kadu : रवी राणा हे फडणवीस आणि शाहांच्या जवळचे, त्यामुळे…; बच्चू कडू यांचे धक्कादायक वक्तव्य