pakistan lost match against zimbabwe | टी २० विश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. पर्थमध्ये गुरुवारी (२७ ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला १३१ धावांचे लक्ष्य दिले होते, पण त्यांना आठ विकेट्सवर १२९ धावाच करता आल्या. सध्याच्या स्पर्धेत पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे.
याआधी पहिल्या सामन्यात पाकिस्तानला भारताने ४ विकेट्सने पराभूत केले होते. झिम्बाब्वेविरुद्धचा सामन्यात खुपच थरार पाहायला मिळाला. शेवटच्या षटकात पाकिस्तानला ११ धावांची गरज होती. ब्रॅड इव्हान्सच्या पहिल्याच चेंडूवर नवाजने तीन धावा घेतल्या.
त्यानंतर पुढच्याच चेंडूवर वसीमने चौकार मारला. आता पाकिस्तानला चार चेंडूत चार धावा करायच्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर वसीमने एक धाव घेतली, म्हणजेच आता तीन चेंडूत तीन धावा करायच्या होत्या. चौथ्या चेंडूवर नवाजला एकही धाव घेता आली नाही, त्यामुळे आता पाकिस्तानला दोन चेंडूत तीन धावा करायच्या होत्या.
नवाजवर दबाव वाढला होता आणि तो पाचव्या चेंडूवर बाद झाला. शेवटच्या चेंडूवर तीन धावा करायच्या होत्या, पण पाकिस्तान संघाला एकच धाव करता आली. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेताना झिम्बाब्वे संघाने कर्णधार क्रेग इर्विन (१९ धावा) आणि वेस्ली माधवेरे (१७ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ४२ धावा जोडून चांगली सुरुवात केली.
ही भागीदारी रौफने तेव्हा तोडली जेव्हा त्याच्या वेगवान चेंडूला इर्विनने शॉर्ट फाईन लेगवर शॉर्ट मारला पण मोहम्मद वसीमने झेल घेत झेलबाद केले. दोन चेंडूंनंतर मधेवरेही पॅव्हेलियनमध्ये पोहोचला, त्याला मोहम्मद वसीमने एल्बडब्ल्यूने बाद केले. नंतर मिल्टन शुम्बा (८) चांगली कामगिरी करु शकला नाही.
त्यानंतर शॉन विल्यम्स (३१ धावा) आणि सिकंदर रझा (९) यांनी चौथ्या विकेटसाठी ३१ धावा जोडून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र शादाबने १४ व्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. शादाबने आधी विल्यम्स आणि नंतर रेगिसला बाद केले. पुढच्याच षटकात वसीमने सिकंदर रझा आणि ल्यूक जोंगवेलाही बाद केले.
त्यामुळे झिम्बाब्वेचा संघ आठ गडी विकेट्स गमावून १३० धावा करू शकला. तर पाकिस्तानच्या फलंदाजांनांना चांगली कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीमने २४ धावांत ४ बळी घेतले. दुसरीकडे फिरकी गोलंदाज शादाब खानने २३ धावा देत तीन बळी घेतले. पण झिम्बाब्वेचा हा थरारक विजय सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या-
दिवाळीला पगार आणि सुट्टी न दिल्यामुळे भडकले कर्मचारी, लोखंडी रॉड मारुन घेतला मालकाचा जीव
Rohit Sharma : VIDEO: रोहित शर्माने लाईव्ह मॅचमध्ये काढली पॅन्ट, लाजिरवाणा प्रकार कॅमेऱ्यामध्ये झाला कैद
kamal kishor mishra : धक्कादायक! मॉडेलसोबत रोमान्स करत होता ‘हा’ प्रसिद्ध निर्माता, पत्नीने पकडलं तर अंगावर घातली गाडी