Pakistan,tomato-onion,flood/ पुरामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. सुमारे 33 दशलक्ष लोकांना पुराचा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीला हवामान बदलाचे कारण मानले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पाकिस्तान जागतिक कार्बन उत्सर्जनाच्या (global carbon emissions) 1% पेक्षा कमी उत्पादन करतो. परंतु हवामान संकटामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जगातील टॉप-10 देशांपैकी एक आहे.
लाहोर आणि पंजाब प्रांतातील इतर भागांमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे विविध भाज्या आणि फळांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान सरकार भारतातून टोमॅटो आणि कांदा आयात करू शकते. येत्या काही दिवसांत कांदा आणि टोमॅटोचे भाव किलोमागे 700 रुपयांपर्यंत जाण्याची भीती आहे.

त्याचप्रमाणे बटाट्याचा भाव 40 रुपये किलोवरून 120 रुपये किलोपर्यंत वाढू शकतो. बलुचिस्तान आणि सिंधमध्ये, पुरामुळे हजारो एकर पिके नष्ट झाली आहेत, ज्यामुळे बाजारपेठेत भाज्यांचा पुरवठा कमी झाला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुरामुळे आतापर्यंत 1,030 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात सिंधमधील 74, खैबर पख्तूनख्वामधील 31, गिलगिट-बाल्टिस्तान (G-B) मध्ये सहा, बलुचिस्तानमध्ये चार आणि पंजाबमधील एकाचा समावेश आहे.

बलुचिस्तानमध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. यंदाचा पावसाळा गेल्या महिन्यात सुरू झाला. त्यामुळे क्वेटा आणि किला अब्दुल्ला येथे धरण फुटले. जूनपासून आलेला पूर आणि मुसळधार पावसाने जवळपास सर्वच प्रांतात कहर केला आहे. हवामान बदलाच्या परिणामामुळे निर्माण झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत मानवतावादी संकट लक्षात घेऊन सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बलुचिस्तानला पुरामुळे झालेल्या विध्वंसाचा सामना करण्यासाठी 10 अब्ज रुपयांची मदत जाहीर केली आहे. पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या परिस्थितीचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला दिसून येतो.
यापूर्वी पंतप्रधानांना सांगण्यात आले होते की, बलुचिस्तानमधील 20 जिल्हे पुरामुळे उद्ध्वस्त झाले आहेत आणि सुमारे 13 लाख लोकांची स्थिती वाईट आहे. सुमारे 65,000 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अर्धा पाकिस्तान पुरामुळे बुडाला आहे. असा पूर लोकांनी पहिल्यांदाच पाहिला आहे. अनेक पूल वाहून गेले. रस्ते खराब झाले आहेत. घरांचीही तीच अवस्था आहे.
महत्वाच्या बातम्या-
Rohit Sharma: ‘हा’ धडाकेबाज गोलंदाज रोहितला भासून देणार नाही बुमराहची उणीव, पाकिस्तानला पडणार तोंडघशी
‘माझी ताकद काय, मला माहिती आहे’; पाकिस्तानला हरवल्यानंतर हार्दिक पांड्याने सांगितली रणनीती
पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर पांड्यावर फिदा झाला रोहीत; खुल्या दिलाने कौतूक करत म्हणाला…






