ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या भूमीत तीन सामन्यांची कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला आहे. एकीकडे 24 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाच्या पाहुणचारावरून पाकिस्तानला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.(Pakistan feeds Australia with dal-roti)
Daal and roti for lunch too. Delicious pic.twitter.com/w5KgimFo1N
— Marnus Labuschagne (@marnus3cricket) March 11, 2022
खरं तर, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेनने (Marnus Labuschagne) त्याच्या ट्विटर हँडलवरून पाकिस्तानमधील लंचचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मार्नसने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘दुपारच्या जेवणातही दाल आणि रोटी.’ त्याने कॅप्शनमध्ये जेवण ‘स्वादिष्ट’ असे लिहिले असले तरी, पाकिस्तानने पाहुणचारात संघाला जेवणासाठी दाल रोटी दिल्याबद्दल चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे.
i am henceforth never criticising the mess. 🤝 https://t.co/bf7Xih0SC4
— motherlover (@titanplayer42) March 11, 2022
मार्नस लॅबुशेनने हा फोटो शेअर करताच यूजर्सनी ते रिट्विट करायला सुरुवात केली आणि सोशल मीडियावर पाकिस्तानवर टीका सुरू झाली. काहींनी पाकिस्तानवर राग काढला तर काहींनी ऑस्ट्रेलियाच्या साधेपणाचे कौतुक केले. एका यूजरने लिहिले की, ही डाळ नाही तर डाळीच पाणी आहे. यातून डाळ शोधणे फार कठीण काम आहे. एक वापरकर्ता म्हणतो, ‘या देशात अन्न मिळत आहे हेच पुरेसे आहे.
https://twitter.com/its_Engineer__/status/1502493583538290692?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1502493583538290692%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fnews%2Fworld%2Fare-you-in-jail-pakistan-is-feeding-lentils-and-bread-to-the-australian-team-in-lunch-social-media-user-made-fun-of-it-2079886
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. पहिली कसोटी रावळपिंडी येथे खेळली गेली, जेथे खेळपट्टीचे वर्णन आयसीसीने सरासरीपेक्षा वाईट असल्याचे सांगितले आणि मोठी कारवाई केली. पहिल्या कसोटीत पाकिस्तानच्या संघाने पहिला डाव 476 धावांवर घोषित केला.
who eats that 🤐
— aish (@noaishforaish) March 11, 2022
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 459 धावांत सर्वबाद झाला. तर दुसऱ्या डावात पाकिस्तानने विकेट न गमावता 252 धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानची एकही विकेट काढता आली नाही. त्यानंतर खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि चौकशीत आयसीसीने खेळपट्टीला सरासरीपेक्षा वाईट म्हटले.
महत्वाच्या बातम्या-
सहा कोटी सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दणका; पीएफ वरील व्याजात प्रचंड घट
द कश्मीर फाईल्स चित्रपट पाहून सलील कुलकर्णी म्हणाले, टूटे हुए लोग बोलते नहीं है, उन्हें सुनना पडता है
VIDEO: जबरदस्त ऍक्शन स्टंट करताना दिसली दिशा, व्हिडीओ पाहून लोकांनी काढली टायगरची आठवण
काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षही ठरला!, सोनियांनी दिला राजीनामा पण