Share

Pakistan : अखेरच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव, ५ विकेट्सने सामना जिंकत पाकिस्तान सेमी फायनलमध्ये

pakistan

pakistan enter in semi final  | टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये पाकिस्तानने आपल्या अखेरच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जो हा सामना जिंकेल तो सेमी फायनलमध्ये जाणार होता. अशात हा सामना पाकिस्तानने जिंकल्यामुळे बांगलादेश या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाला २० षटकात ८ विकेट्स गमावून केवळ १२७ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने हे लक्ष्य १८.१ षटकात ५ विकेट्स गमावून पूर्ण केले. गट-२ मधून पाकिस्तानशिवाय भारत सेमी फायनलमध्ये पोहचला आहे.

या सामन्यात शाहीन आफ्रिदीने (२२ धावांत ४ विकेट) आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्यामुळेच बांगलादेशला टी २० वर्ल्डकपच्या ‘करो या मरो’ सामन्यात १२७ धावांवर रोखता आले आहे. डावखुरा सलामीवीर नजमुल हुसेन शांतोने अवघड खेळपट्टीवर ४८ चेंडूत ५४ धावांची खेळी केली पण तरीही बांगलादेशला हा सामना जिंकता आला नाही.

बांगलादेशसाठी नजमुल हुसेनने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक झळकावले. यादरम्यान तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. लिटन दास लवकर बाद झाल्यानंतर शांतो आणि सौम्या सरकार यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ७२ धावांची भागीदारी करून बांगलादेशला चांगला स्कोर उभा करण्यात मदत केली.

यावेळी संघ १५० हून अधिक धावा करेल असे वाटत होते पण त्यानंतर शादाब खानने (३० धावांत २ विकेट) विकेट घेण्यास सुरुवात केली.१२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानी संघाकडून यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ३२ धावा केल्या. त्याने ३२ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार ठोकला.

तसेच रिझवानशिवाय मोहम्मद हरीसने १८ चेंडूंत १ चौकार आणि २ षटकारांसह ३१ धावांचे योगदान दिले. शान मसूद २४ धावांवर नाबाद परतला. बांगलादेशकडून कर्णधार शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, इबादत हुसेन आणि नसुम अहमद यांनी १-१ विकेट घेतल्या.

महत्वाच्या बातम्या-
Shrilanka : क्रिकेटविश्वात खळबळ! वर्ल्डकप सुरू असताना ‘या’ स्टार खेळाडूला बलात्काराच्या आरोपाखाली अटक
Sania mirza : सानिया मिर्झा-शोएब मलिक वेगळे होणार? सानिया मिर्झाच्या ‘त्या’ पोस्टने उडाली खळबळ
india : अखेरचा सामना जिंकला, गमावला किंवा रद्द झाला तर भारताचा भविष्य काय? जाणून घ्या तिन्ही शक्यता

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now