virat kohli : …अन् पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही झाला विराटसमोर नतमस्तक; वाचा काल रात्री काय घडलं?

virat kohli : कालची मॅचमध्ये विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने कौतुकास्पद कामगिरी केली. आपल्या भारतीय संघाने टी 20 विश्वचषकात पाकिस्तानला आसमान दाखविले आहे.  विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने ११३ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

भारतीय संघाने टी २० विश्वचषकात पाकिस्तानला पराभूत करून शानदार सुरुवात केली आहे. या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग सोपा झाला आहे. या सामन्यात १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३१ धावांत चार विकेट गमावल्या.

यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने ११३ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन केले. अखेरच्या षटकात निर्णायक क्षणी हार्दिक बाद झाला तरी कोहली भारताला विजय मिळवून देऊनच परतला. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

एवढंच नाही तर पाकिस्तानच्या खेळाडूणे देखील भारतीय संघाचे कौतुक केले आहे. तुम्हाला माहितीच असेल की, जागतिक क्रिकेटमध्ये बाबर आझमची तुलना विराट कोहलीशी केली जाते. मात्र काल विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली. सध्या विराटवर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

एवढंच नाही तर, विराटच्या वादळासमोर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम हासुद्धा नतमस्तक झाला आहे. विराटचे कौतुक करताना आझमम म्हणाला की, विराट कोहलीने सामन्यात त्याच्या कौशल्याचं उत्कृष्ट उदाहरण सादर केलं. हा एक रोमांचक सामना होता आणि प्रेक्षकांनी त्याचा मनसोक्त आनंद लुटला.

विराटचे कौतुक करताना बाबर आझम पुढे म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यामध्ये अतिरिक्त दबाव हा नेहमीच असतो. तुम्ही जेवढ्या लवकर या दबावातून बाहेर पडता तेवढं चांगलं असतं. या कारणामुळेच विराट हा मोठा खेळाडू असल्याच बाबर आझम याने सांगितलं आहे.

विराटवर दबाव होता. मात्र त्याने त्यावर मात करत डाव सावरला. त्याने ज्याप्रकारे भागीदारी केली, ती सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरली. या खेळीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असेल, असे मत देखील यावेळी बोलताना बाब आझमने व्यक्त केले. अजूनही याच सामन्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल