Share

पाकड्यांची मस्ती जिरली; बलोच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 100 पाकिस्तानी सैनिक ठार

बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी पाकिस्तानी लष्करावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात फ्रंटियर कॉर्प्सचे आयजी मेजर जनरल आयमन बिलाल सफदर यांनाही प्राण गमवावे लागले, असे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानी लष्कर आणि बलुच लिबरेशन आर्मी यांच्यात सातत्याने संघर्ष सुरू आहे. पाकिस्तान सरकार त्यांच्यावर दडपशाही करत असल्याचा आरोप बलुचिस्तानमधील नागरिक करतात. पाकिस्तानी सरकारला विरोध करणारे लोक हे लष्कर आणि प्रशासनाकडून मारले जातात. मात्र यावेळी दोन आघाड्यांवर एकाच वेळी झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सैनिकांना सावरण्याची संधी मिळाली नाही. त्यांची पळता भूई थोडी झाली.

बलुचांच्या हल्ल्यात पाकिस्तानी सैनिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या या भागात गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे. बलुच लिबरेशन आर्मीने नोश्की आणि पंजुगुरमध्ये भीषण हल्ला केला आहे. बलुच हल्ल्याने पाकिस्तानी सैन्याच्या अडचणी वाढल्या आहेत. आता कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पाकिस्तानसमोरचे सर्वात मोठे आव्हान राहिले आहे.

पाकिस्तानी लष्करासाठी ही अत्यंत दु:खद बातमी आहे. दोन्ही भागात हल्ले झाल्याची कबुली पाकिस्तानचे मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी दिली आहे. मंत्र्याने बलूच लिबरेशन आर्मीच्या मारल्या गेलेल्या लोकांचे दहशतवादी म्हणून वर्णन केले आहे आणि आपल्या सैनिकांच्या स्तुतीसाठी गाण्यांचे पठण केले आहे.

यांच्यामध्ये युद्धाचे कारण म्हणजे, बलुचिस्तान हा पाकिस्तानचा प्रांत आहे. या प्रांतातील लोकांना पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे. बलुचिस्तानी लोक प्रदीर्घ काळापासून स्वतंत्र असल्याचा दावा करतात आणि पाकिस्तानने आपल्यावरचा कब्जा संपवावा अशी त्यांची इच्छा आहे.

जगाच्या विविध भागात बलुच संघटना स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. परदेशात निर्वासित राहणाऱ्या बलुचिस्तानमधील बहुतांश नेत्यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या लष्कराने बलुच समुदायावर अत्याचार केले आहेत. पाकिस्तानने बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी, अशी बलुचिस्तानच्या नागरिकांची मागणी आहे.

आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now