Share

“राज ठाकरेंना तुरुंगात टाका, मगच त्यांचं डोकं शांत होईल”, असदुद्दीन ओवैसी भडकले

raj thackeray

‘राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे हिंसेला निमंत्रण आहे. याची पोलिस स्वत:हून दखल का घेत नाहीत? असा सवाल उपस्थित करत एआयएमआयएम(AIMIM) प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.

औरंगाबादमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी ‘४ मेपासून कोणाचंही ऐकून घेणार नाही. मशिदीचे भोंगे सुरू झाले की त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणारच,’ असा इशारा दिला. ‘मशिदीवरील भोंगे हा धार्मिक विषय नाही. तो सामाजिक आहे. मात्र ज्याला कोणाला हा धार्मिक विषय वाटत असेल, त्यांना मग आम्ही धर्मानेचं उत्तर दे, असं ते म्हणाले.

यावरून आता पुन्हा राजकारण तापलं आहे. औवेसी यांनी राज यांच्या अटकेची मागणी केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान करणाऱ्या नवनीत आणि रवी राणा यांच्यावर कारवाई होऊ शकते, तर राज ठाकरेंवर कारवाई का होऊ शकत नाही?, असा संतप सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच ‘राज ठाकरेंना तुरुंगात टाकले तरच त्यांचे डोके थंड होईल’, अशी जहरी टीका त्यांनी थेट राज यांच्यावर केली. ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भावावर कारवाई करायची नाही,  तुम्हाला महाराष्ट्राला दिल्ली बनवायचे आहे का? असा संतप्त सवाल औवेसी यांनी उपस्थित केला.

दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांनी अगदी शांतपणे यावर सविस्तर भाष्य केलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणतात, ‘राज यांच्या अल्टिमेटमबाबत महाराष्ट्र सरकार, पोलीस प्रशासन निर्णय घेईल. राज ठाकरे यांनी मुस्लिमांना अल्टिमेटम दिलं नसून राज्य सरकारला दिला आहे. मुस्लिम समाजाने यावर प्रतिक्रिया देण्याची काहीही गरज नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

तसेच पुढे बोलताना जलील म्हणाले, ‘मी चुकीच्या गोष्टींचं समर्थन करणार नाही. प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला आहे. तो आदेश पटो न पटो, पाळवाच लागेल, अशा शब्दांत जलील भूमिका स्पष्ट केली. मात्र सध्या राज ठाकरेंच्या अटकेच्या मागणीने जोर धरला आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
अजय देवगण आणि काजोलचे घर आहे तब्बल ६० कोटी रुपयांचे; घरातले फोटो पाहून डोळे विस्फारतील
राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राज ठाकरेंना अटक होणार? पहा नेमकं काय घडलयंं
टिळकांनी समाधी बांधण्यासाठी पैसे गोळा केले पण समाधी बांधली नाही; आव्हाडांचा पुराव्यानिशी गंभीर आरोप
अक्षय कुमारनंतर यशलाही मिळाली पान मसाल्याची करोडोंची ऑफर; पण त्याने घेतला ‘हा’ निर्णय

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now