काही दिवसांपूर्वी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर मनसेत नाराजीनाट्य सुरू झाले आहे. तसेच राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच्या ठाणे येथील सभेत भोंगे हटविण्याची अंतिम मुदत दिली आहे.
ठाणे येथील सभेतही ठाकरे हे आपल्या विधानावर ठाम राहील्याने पक्षात आणखीनच नाराजी वाढली आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक मुस्लीम कार्यकर्ते मनसेला जोडले गेलेले आहेत. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर ते पक्षावर नाराज असल्याचे समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसे सरचिटणीस आणि कार्यकारणी सदस्य फिरोज पी. खान यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्या सोबतच 35 जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई आणि मराठवाड्यातील 35 मनसे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मनसेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
‘मी गेल्या अनेक वर्षांपासून मनसेसोबत काम करत आहे. मात्र राज साहेब ठाकरे यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे काम करणं कठीण झाले आहे, राज साहेबांनी बदललेल्या भूमिकेमुळे मला राजीनामा द्यावा लागत आहे, असे फिरोज पी. खान यांनी म्हंटले आहे.
तसेच ठाणे येथील सभेतही ठाकरे हे आपल्या विधानावर ठाम राहील्याने कल्याणमधील नाराज झालेले पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी गुरूवारी मनसे प्रदेश सचिव आणि सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. सचिव इरफान शेख यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला आणखी एक धक्का बसला आहे.
ठाण्यात बोलताना राज ठाकरेंनी भोंग्याबाबतची भूमिका कायम ठेवल्याने इरफान शेख यांनी राजीनामा देण्याचा टोकाचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर शेख यांनी राजीनामा सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या निर्णयाबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
तसेच अत्यंत भावूक होत शेख यांनी हा राजीनामा दिला असून आपण ज्या समाजातून येतो त्याच समाजाच्या विरोधात पक्षाध्यक्ष द्वेषात्मक भूमिका घेत असतील तर समाजासाठी पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र म्हणण्याची वेळ आली असल्याची भावना यावेळी शेख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
RSS ची रुग्णालयं फक्त हिंदूसाठीच आहेत का? रतन टाटांच्या या प्रश्नावर गडकरी म्हणाले..
आलियाच्या कलिऱ्यांमध्ये आणि मंगळसुत्रामध्ये दडलाय ‘हा’ खास आकडा, रणबीरशी आहे थेट संबंध
आज ऋषी कपूर जीवंत असते तर.., रणबीरच्या डोक्याला बाशिंग पाहून नीतू कपूर पतीच्या आठवणीत भावूक
राकेश झुनझुवालांच्या ‘या’ ५ स्टॉक्सवर डोळे झाकून ठेवा विश्वास, करून देत आहेत प्रचंड कमाई