Share

Amit Thackeray : ….नाहीतर मी राजकारणात आलोच नसतो; अमित राज ठाकरे असं का म्हणाले

Amit Thackeray

Amit Thackeray : महाराष्ट्रातील आक्रमक बाण्याच्या शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. नाराज शिंदे गटाने भाजपशी हात मिळवणी करत नवे सरकार स्थापन केले. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. त्यावर ‘मी आधीच राजकारणात आलो ते बरं झालं. आत्ताची परिस्थिती पाहता या काळात मी राजकारणात आलो नसतो,’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना दिली.

माध्यमांकडून अमित ठाकरेंना तुम्ही दसरा मेळाव्याला कोणाचे भाषण ऐकले? असे विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, ‘दसरा मेळाव्यातील कोणाचे भाषण मी ऐकले नाही, का ऐकावे? त्यात लोकांच्या समस्यांवर कोण बोलले का? शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कोणी चर्चा केली का? हे सोडून फक्त एकमेकांवर चिखलफेक त्याठिकाणी झाली.’

‘लोकंसुद्धा राज्यातील या राजकारणाला कंटाळली आहे. तसेच शिवसेनेत आता फूट पडली आहे. पुढच्या काळात लोक मनसेला समर्थन देतील. मनसे हा तरुणांसमोर चांगला पर्याय असणार आहे. त्यामुळे तरुणांच्या मनावर फुंकर घालण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी या दौऱ्यावर आलो आहे.’ असं अमित ठाकरे म्हणाले.

औरंगाबादमधील या दौऱ्यावर असताना अमित ठाकरेंनी तेथील महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला. राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये मनविसेच्या शाखा सुरू करणार असून त्या माध्यमातून तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम मनसे करेल. तसेच प्रसंगी तरुणांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणार असल्याचे भाष्य यावेळी अमित ठाकरेंनी केले.

अमित ठाकरे यांच्या राज्यातील ठिकठिकाणी होत असलेल्या दौऱ्यांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच लोकांमध्ये जात त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न अमित ठाकरे करताना दिसतात. त्यामुळे तरुणांमध्ये अमित ठाकरेंबाबत क्रेझ निर्माण झाल्याचे पहायला मिळते.

अमित ठाकरेंच्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाची, स्टायलिश लुकची तरुणांना भुरळ पडते. मात्र त्यासोबत अमित ठाकरे हे फार नम्र स्वभावाचे आहेत, हे वारंवार त्यांच्या दौऱ्यांमधून, कार्यकर्त्यांमध्ये मिसळून जाण्यावरून दिसून आले. त्यामुळे अमित ठाकरे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणांमध्ये फिरून पक्षाचे संघटन वाढवण्याकडे त्यांचा कल असल्याचे यातून दिसून येते.

महत्वाच्या बातम्या-
Death : ब्रेकिंग! पणन महासंचालक घोरपडेंचा मृतदेह दोन दिवसांनी नीरा नदीपात्रात सापडला; हत्येचं गुढ कायम
bjp : टाईमपास’फेम दगडू गेला भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत, म्हणाला, “माझ्या घरात गटाराचं पाणी…
shivsena : रामदास आठवलेंना जबर धक्का..! बड्या नेत्याने बांधले हाती शिवबंधन, राजकीय समीकरण बदलणार?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now