organizer revealed about sabhaji bhide | सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका सुधा मूर्ती यांची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांची भेट त्यांनी घेतली होती. त्या भेटीनंतर त्या त्यांच्या पायाही पडल्या होता. त्यामुळे सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला आहे.
पाया पडतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सुधा मूर्तींच्या कार्यक्रमाचं नियोजन सुरु होतं. तेव्हापासून भिडेंकडून दिवसाला दोन तीन फोन येत होते, असा दावा आयोजकांनी केला आहे
मेहता पब्लिकेशन हाऊसच्या एडिटोरिअल हेड आणि कार्यक्रमामध्ये निवेदक असणाऱ्या योजना यादव यांनी एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी संपुर्ण व्हिडिओ भाष्य केले आहे. तसेच भिडेंनीच आपल्याला फोन केल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सुधा मूर्ती यांनी आधीच सांगितलं होतं की कोणाला भेटणार नाही. पण भिडेंकडून दिवसाला दोन-तीन फोन यायचे. आम्ही त्यांना आधीच नाही म्हणून सांगितलं होतं. सुधा मूर्ती तिथे यायच्या आधीच भिडे तिथे पोहचले. सुधा मूर्ती या दुपारी हॉटेलवर आल्या होत्या. संध्याकाळी पाचला कार्यक्रम असल्याने त्या विश्रांतीसाठी गेल्या होत्या, असे योजना यादव यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे त्या म्हणाल्या की, संध्याकाळी पाचला कार्यक्रम होता, पण भिडे तीन वाजल्यापासून लॉबीमध्ये होते. त्यामुळे आम्हाला सुधा ताईंना मागच्या दरवाजाने बाहेर पाठवावं लागलं. पण तिथेही भिडेंचे कार्यकर्ते धावत आले. त्यावेळी सुधा ताई म्हणाल्या की, कोण ही व्यक्ती आणि त्यांना मला का भेटायचं? तेव्हा आम्हालाही काही माहित नव्हतं.
त्यानंतर कार्यक्रम व्यवस्थित सुरु झाला. त्यांना कोणाला भेटायचं सुद्धा नव्हतं. पण हॉलबाहेर भिडेंचे कार्यकर्ते गर्दी करत होते. पोलिसांचीही चिंता वाढत होती. त्यामुळे सुधा मूर्ती वैतागून त्यांना भेटल्या. फार वय दिसत होतं. त्यामुळे म्हातारे आहे म्हणून त्यांनी नमस्कार केला. भिडे म्हणत होते दीड तास बोलायचंय, पण सुधाताई म्हणाल्या की, मला दीड मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही. त्यानंतर त्या निघून गेले, असेही योजना यादव यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Shivsena: बिग ब्रेकींग! शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर; १०० दिवसांनी होणार तुरूंगातून सुटका
Pandurang chavhan : लग्नानंतर २१ दिवसांत तरुणाचा मृत्यू, कुटुंबियांनी जे सांगितलं ते ऐकून पोलिसही हादरले; पत्नीला अटक
Ranbir Kapoor: लेकीला पहील्यांदा पाहताच रडू लागला रणबीर; लाडक्या लेकीला दोन्ही हातात घेतलं अन्…