राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार काही दिवसांपूर्वीच पार पडला आहे. मंत्रीमंडळ विस्तार पार पडल्यानंतर शिंदे गटातील मंत्री हे आपापल्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. मंत्रीमंडळात स्थान मिळालेल्या संदीपान भुमरे यांनी देखील नुकतीच मतदारसंघात भेट दिली.
मात्र भुमरे यांना एक विचित्रच प्रकार पाहायला मिळाला. भुमरे हे पहिल्यांदाच मतदार संघात आले. मात्र त्यांच्या स्वागताला कोणीही उपस्थित नव्हतं. विशेष बाब म्हणजे, भुमरे यांच्या कार्यक्रमासाठी आणलेल्या खुर्च्या देखील रिकाम्या होत्या. तर दुसरीकडे 12 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची पैठण येथे होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेला असा प्रकार घडू नये यासाठी भुमरे यांनी एक युक्ति लढवली आहे. सध्या भुमरे यांच्या व्यक्तव्याची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेत देखील पुन्हा तीच नामुष्की ओढावू नये म्हणून पैसे देऊन सभेसाठी नागरिक जमवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सध्या समोर येतं आहे.
याबद्दलचा खळबळजनक खुलासा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सभेला या अन् रोख पॅकेज मिळावा, या भुमरे यांच्या व्यक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमा करावी असे आदेशच पदाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती मिळाली आहे. काहीही करा पण मुख्यमंत्र्यांची गर्दी झाली पाहिजे असा निर्धारच मंत्री भुमरे यांनी केला आहे.
यामुळे आता 12 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी होणार की नाही? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री सध्या राज्यातील प्रत्येक भागात जाणून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी जोरदार मोर्चेबांधणीची सुरुवात केली आहे.