भोंगा प्रकरणानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक गर्भित इशारा दिला. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. असे असतानाच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याच सांगितलं होतं.
अखेर आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. याबाबत खुद्द शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 10 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहे. त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी झाली असल्याच देखील राऊत यांनी सांगितलं.
मात्र राज ठाकरेंच्या पाठोपाठ आता आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला देखील विरोध दर्शविण्यात येत आहे. महाराणा प्रताप सेनेचे संस्थापक राजवर्धन सिंह यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात भूमिका घेतली आहे. आदित्य ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले, आदित्य ठाकरे हे जर अयोध्येत येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. कारण त्यांच्या आजोबांनी राम मंदिराच्या आंदोलनात योगदान दिले आहे. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं मानसिक संतुलन सोनियाभिमुख झालं आहे. त्यामुळे अशा लोकांना महाराणा प्रताप सेना पाकिस्तानात पाठवण्याचं काम करेल, असे राज्यवर्धन सिंह म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
राज साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर.., राज ठाकरेंना धमकी आल्यानंतर मनसे आक्रमक
आता कॉलेज डिग्री नसली तरी मिळणार ३० हजार पगार, सरकारने केली मोठी घोषणा
बॉलिवूडला मी परवडणार नाही असं म्हणणारा महेश बाबू कमावतो तरी किती? वाचून अवाक व्हाल
पैशांचं पॉकेट मागच्या खिशात ठेवताय? तुम्हाला होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार, तज्ञांनीच केलाय दावा