आम्ही तुम्हाला अशा एका बिझनेस आयडियाबद्दल (Business Idea) सांगणार आहोत, ज्याची सुरूवात करून तुम्ही पहिल्या दिवसापासून मोठी कमाई करू शकता. अमूल (Amul) या दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या कंपनीसोबत व्यवसाय करण्याची यावेळी मोठी संधी आहे. वास्तविक, अमूल फ्रँचायझी (Amul franchise) देत आहे. छोट्या गुंतवणुकीत दर महिन्याला नियमित कमाई करता येते.(opportunity-to-earn-with-amul-start-a-business-with-2-lakhs)
अमूलची फ्रेंचायझी घेणे हा एक फायदेशीर करार आहे. यामध्ये नगण्य नुकसान होण्याची शक्यता आहे. अमूल कोणतीही रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेयरिंगशिवाय फ्रेंचायझी देत आहे. इतकेच नाही तर अमूलची फ्रँचायझी घेण्याचा खर्चही फारसा जास्त नाही. तुम्ही 2 लाख ते 6 लाख रुपये खर्च करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाच्या सुरुवातीलाच चांगला नफा मिळू शकतो.
फ्रँचायझीच्या माध्यमातून दरमहा सुमारे 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. तथापि, ते ठिकाणावर देखील अवलंबून असते. अमूल दोन प्रकारच्या फ्रेंचायझी देत आहे. प्रथम अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्कची फ्रँचायझी आणि दुसरी अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी. जर तुम्हाला पहिल्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये गुंतवावे लागतील.
दुसरीकडे, जर तुम्ही दुसरी फ्रेंचायझी घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला 5 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये 25 ते 50 हजार रुपये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. अमूल आउटलेट घेतल्यावर, कंपनी अमूल उत्पादनांच्या किमान विक्री किंमतीवर (MRP) कमिशन देते. यामध्ये एका दुधाच्या पाऊचवर 2.5 टक्के, दुग्धजन्य पदार्थांवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते.
अमूल आइस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रँचायझी घेतल्यावर रेसिपीवर आधारित आइस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन मिळते. त्याच वेळी, कंपनी प्री-पॅक केलेल्या आइस्क्रीमवर 20 टक्के आणि अमूल उत्पादनांवर 10 टक्के कमिशन देते. तुम्ही अमूल आउटलेट घेतल्यास, तुमच्याकडे 150 चौरस फूट जागा असावी.
तसेच, अमूल आईस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायझीसाठी, किमान 300 चौरस फूट जागा असावी. जर तुम्हाला फ्रँचायझीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला [email protected] वर मेल करावा लागेल. याशिवाय http://amul.com/m/amul scooping parlors या लिंकवर जाऊनही माहिती घेता येईल.
महत्वाच्या बातम्या-
शेतक-याच्या बच्छड्यानो या नादान राज्यकर्त्यांच्या नरडीचा घोट घेऊ पण आपले आयुष्य संपवू नका
वयाच्या ४५ व्या वर्षीही अमिषा पटेलचा बोल्डनेस कायम, फक्त टी शर्टवर असताना शेअर केला व्हिडीओ
शेन वाॅर्नने १००० मुलींसोबत सेक्स केला पण फक्त ५ मुलींसोबत…; पुस्तकातून मोठा खुलासा
रशियाने १५ वर्षांत सर्वोत्तम सैन्य कसं उभारलं? ज्याला घाबरून अमेरिकासुद्धा थरथर कापतीय; जाणून घ्या..