सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन म्हणजे डोळ्यांची फसवणूक करणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये आपल्याला लपलेली एखादी गोष्ट शोधायला सांगत असतात. त्यातून आपली नजर किती तीक्ष्ण आहे याची टेस्ट होत असते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फोटोत असणारे बिबटे शोधून काढायचे आहेत.
फोटो पाहिल्यानंतर सर्व प्रथम आपल्या डोळ्यांना फक्त एकच बिबट्या दिसतो. मात्र फोटोत दुसरा देखील एक बिबट्या आहे,जो शोधून दाखवायचा आहे. मात्र, हा शोधायला गेलात तर वाटते तितके सोपे नाही, कारण तुमच्या डोळ्यांना चित्र पाहून पाणी येईल मात्र तो लपलेला बिबट्या लवकर दिसणार नाही. सध्या सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हा फोटो ‘ऑप्टिकल इल्युजन’ चे उत्तम उदाहरण आहे. हे चित्र पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी येईल परंतू तुम्हाला निश्चित उत्तर लवकर मिळणार नाही. अनेक जण शोधून शोधून थकले आहेत. काहींना उत्तर मिळाले आहे तर काही जणांना अजूनही फोटोत बिबट्यांची संख्या किती आहे, हे सांगता येत नाही.
या फोटोत प्रत्यक्षरित्या एकच बिबट्या दिसतो. मात्र, अजून एक दुसरा बिबट्या आहे जो तुम्हाला सहजासहजी दिसत नाही. दुसऱ्या बिबट्याची शेपटी ही प्रखरपणे दिसणाऱ्या बिबट्याच्या तोंडापुढेच दिसते. मात्र त्या बिबट्याचा चेहरा तुम्हांला सहज दिसत नाही. या दुसऱ्या बिबट्याचा चेहरा तुम्हाला कुठे दिसतो का पाहा.
तुमच्याकडे 30 सेकंद आहेत, दुसऱ्या बिबट्याचा चेहरा दिसतो की नाही ते बघा. दिसला तर तुमच्या डोळ्यांना खरच मानलं. अनेक जणांची यात गल्लत होत आहे. काहींनी तर शेवटी हार मानून कमेंट मध्ये लिहिले आहे की, चित्रात दुसरा बिबट्याच नाही. मात्र तुम्हांला तो दिसतो का पाहा.
तुम्ही देखील हार मानली असेल, आणि तुम्हांला देखील तो बिबट्या दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. या फोटोमध्ये दोन बिबटे आहेत. एक जो चित्र पाहताच क्षणी सर्वांना दिसतो, आणि दुसरा बिबट्या दिसतो दोन खोडांच्यामध्ये. आता सांगा तुम्हांला तो दिसला ना? तुम्हांला दिसला तर कमेंट करून नक्की सांगा.