Share

हे फक्त धोनीच करू शकतो! पहिल्याच सामन्यात केला आगळा वेगळा विक्रम, सचिन-द्रविडलाही टाकले मागे

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2022 चा रणसंग्राम आता सुरू झाला आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये महेंद्रसिंह धोनी पहिल्यांदाच एक खेळाडू म्ह्णून खेळला आहे. असे असताना, त्याने यावेळी देखील आपल्या उत्तम कामगिरीने टीमला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सध्या त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2022 ला काल सुरुवात झाली. यंदाच्या या 15 व्या हंगामामधील पहिला सामना कोलकता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात सीएसकेला वाचवण्यासाठी धोनीने शानदार फलंदाजी केली.

विशेष म्हणजे महेंद्र सिंह धोनीने पहिल्याच सामन्यात महत्वपूर्ण अशी 50 धावांची खेळी केली आहे. हे अर्धशतक ठोकताना धोनीने स्वतःच्या नावावर एक वेगळे रेकॉर्ड केले आहे. केकेआरविरुद्ध अर्धशतक झळकावणाऱ्या धोनीने वयाच्या 40 वर्ष 262 दिवसांचा असताना ही कामगिरी केली आहे.

त्याने त्यामुळे या यादीतील आत्तापर्यंतचा क्रमांक एकचा खेळाडू राहुल द्रविड आणि क्रमांक दोनचा सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सध्या त्याचीच सर्वत्र चर्चा होत आहे. सचिन तेंडुलकर याने 39 वर्ष 362 दिवसांचा असताना, तर राहुलने 40 वर्षे 116 दिवस वय असताना आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले होते.

काल चेन्नईचा संघ 83 वर 5 बाद अशा बिकट अवस्थेत होता. अशा स्थितीत संघाला सावरण्यासाठी धोनीने धमाकेदार कामगिरी केली. त्याने वादळी खेळी खेळत 50 धावा केल्या. त्याच्या या अर्धशतकाने चेन्नईला मोठा दिलासा मिळाला. दुसरीकडे धोनी हा आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वाधिक वयस्कर भारतीय खेळाडू ठरला.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली असली तरी 40 वर्षीय धोनीने कठीण परिस्थितीत खेळताना 38 चेंडूत 50 धावा केल्या. 2019 मध्ये तो भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो आयपीएलशिवाय कोणताही सामना खेळत नाही. धोनीने 35 महिन्यांनंतर आयपीएलमध्ये अर्धशतक केले.

खेळ

Join WhatsApp

Join Now