शिंदे गटात सामील झालेले माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनाच्या ताफ्यावर काल पुण्यात हल्ला करण्याचा आला. ते पुण्याहून मुंबईकडे निघाले होते, तेव्हा कात्रज चौकात हा हल्ला करण्यात आला होता. या थरार घटनेचा सगळा प्रसंग उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितला.
उदय सामंत म्हणाले, माझी गाडी सिग्नलला थांबली असताना ,माझ्या गाडीच्या बाजूला दोन गाड्या येऊन थांबल्या. त्या गाड्यांमधून दोन पांढरे शर्ट घातलेले युवक उतरले. एकाच्या हातात बेस बॉलची स्टिक होती, तर दुसऱ्याच्या हातात दगड बांधलेला होता.
मला ते दोघे येऊन समोरून शिव्या घालत होते. नंतर दुसऱ्या बाजूला ५० ते ६० लोकांचा मॉब होता, मी माझ्या डाव्या बाजूला बघितलं तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांनी माझं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला, असे उदय सामंत म्हणाले.
पुढे म्हणाले, पांढरे शर्ट असलेले हे दोघे युवक होते त्यांच्या हातात सळई होती. ज्याने हा प्रकार केला होता ते काही लोकांना या सर्व घटनेची शूटिंग करायला सांगत होते. त्यांनी शिवीगाळ करून गाडीवर चढून मारण्याचा प्रयत्न केला, अशी धक्कादायक माहिती सामंत यांनी दिली.
तसेच म्हणाले, शिवसैनिकांचे निष्ठावंत कार्यकर्ते सांगत आहेत की, त्यांनी त्यांचा ताफा अडवला तर ते खोटं आहे. माझ्याकडे काही फोटो आहेत, हे फोटो मी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवतो. हातात बघा काय आहे, शिवसैनिक अशा प्रकारच्या सभांना हत्यार घेऊन जात असतील तर ती सभा म्हणावी का असा सवाल केला.
दरम्यान, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी नुकतेच गद्दरांच्या गाड्या फोडा, असा इशारा शिवसैनिकांना दिला होता. सामंत यांच्यावर हल्ला झाल्यावर, थोरात म्हणाले, हा जिवघेणा हल्ला झालेला नव्हता. गद्दारांच्या विरोधात आलेली ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे मत थोरात यांनी व्यक्त केले.