Share

Amey vagh: आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही..’; अमेय वाघ आणि ‘या’ अभिनेत्यामध्ये जुंपली, एकमेकांची लायकी काढली

सध्या दोन मराठी अभिनेत्यांच्या भांडणाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्यांचे वाद- प्रतिवाद पाहून काही जणांचे मनोरंजन होत आहे तर काहीजणांना ही भांडणे खरच आहे की नव्या सिनेमाच्या प्रमोशनचा बँड आहे असे प्रश्न पडत आहेत.

सोशल मीडियावर भांडण करणारे हे दोन मराठी अभिनेते म्हणजे सुमित राघवन आणि अमेय वाघ हे आहेत. मराठी मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये ज्या दोघांचे असंख्य चाहते आहेत. या दोन्ही कलाकारांच्या भांडणावर आता नेटकऱ्यांच्या देखील प्रतिक्रिया येत आहेत.

आता नेमकं त्यांच्या भांडणाला सुरुवात कशी झाली तर, अमेयने फेसबुकवर जी पहिली पोस्ट केली होती त्यामध्ये त्याने सुमितला टॅग केलं आहे. यात अमेय असं म्हणालेला की, ‘जंगलात राघू ‘सुमित राघवन’ खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो. याची कृपया नोंद घ्यावी’.

या पोस्टवर उत्तर देणारी पोस्ट सुमितने केली. सुमित म्हणाला की, ‘सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय… कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही याचीही कृपया नोंद घ्यावी’.आता अमेय सुमितमधलं ‘फेसबुक वॉर’ इथेच थांबलं नाही.

सुमितच्या पोस्टवर अमेयने असं उत्तर दिलं की, ‘वाघ कुठलाही का असेना, शेवटी त्याच्या डरकाळीची दखल घेतलेली दिसतेय’.यावर आता सुमितची लेटेस्ट प्रतिक्रिया समोर आली आहे. यामुळे यांच्यातील वाद अजून वाढत आहे.

सुमितने अमेय वाघच्या पोस्टला उत्तर दिलं आणि असं म्हटलं आहे की, ‘अमेय वाघ घाबरून ठोकलेली ही आरोळी असते, डरकाळी नव्हे आणि जर एखाद्याच्या विव्हळण्याला आपण डरकाळी म्हणत असू तर प्रकरण गंभीर आहे.’ आता या दोन्ही कलाकारांमध्ये जी भांडणं सुरू आहेत, ती नेमकी कशामुळे हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

तसेच आता अमेय आणि सुमित खरोखर भांडत आहेत की यामागे दुसरं काही कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एखाद्या नव्या प्रोजेक्टच्या प्रमोशनचाही भाग असू शकतो, अशीही चर्चा आहे. सध्या चाहत्यांच्याही मजेशीर कमेंट्स या दोघांच्याही पोस्टवर येत आहेत.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now