Share

old actresses : चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळालं पण खऱ्या प्रेमानं कायम छळलं; जुन्या अभिनेत्रींची अवस्था वाचून रडू येईल

old actress

old actresses: ७० च्या दशकात मनोरंजन क्षेत्रात मोठी उंची गाठणाऱ्या काही बॉलीवूड अभिनेत्री प्रसिद्धीच्या शिखरावर असताना वैयक्तिक आयुष्यबाबत पण चर्चेत होत्या. आज आपण अशाच बॉलिवूड अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचं करियर उंचीवर असताना त्यांनी वैयक्तिक आयुष्यात मात्र मोठे चढउतार पाहिले.

अभिनेत्री झीनत अमानने त्या काळात आपल्या बिनधास्त आणि बोल्ड अंदाजाने चाहत्यांची मने जिंकली. मोठ्या चाहतावर्ग असणाऱ्या झीनत अमान यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले. संजय खान यांच्याशी झीनतने गुपचूप लग्न केले होते. संजय खानकडून त्यांना मारहाण व्हायची अशी चर्चा होती. मात्र संजय खानने एका पार्टीत त्यांना केलेल्या मारहाणीमुळे त्यांचा डोळा निकामी झाला. त्यानंतर त्यांनी मजहर खानसोबत लग्न केले. परंतु तोच अनुभव त्यांना पुन्हा आला. अशाप्रकारे झीनत यांचे आयुष्य वैयक्तिक आयुष्य कायम दुखद राहिले.

प्रसिद्ध अभिनेत्री राखी यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांचे लहान वयात लग्न झाले होते. परंतु ते फार काळ टिकले नाही. त्यानंतर त्यांनी कवी गुलजार यांच्याशी लग्न केले. मात्र गुलजार यांना राखींचे सिनेमात काम करणे पसंद नसल्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद व्हायचे. त्यातून गुलजार यांच्याकडून त्यांना मारहाण झाली असे बोलले जाते. त्यानंतर राखी विभक्त झाल्या.

रीना रॉय यांचे यांची लोकप्रियता त्या काळात मोठी होती. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले. त्यांचे आणि शत्रुघ्न सिन्हाचे एकेकाळी घट्ट प्रेमसंबंध होते. मात्र शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या नकळत पुनमशी लग्न केल्यानंतर रीना रॉय आतून तुटल्या. व त्यानंतर रीना यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानसोबत लग्न केले.

त्या दशकात परवीन बाबी आपल्या बोल्डनेसमुळे प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. इंडस्ट्रीत नवा ट्रेंड त्यांनी सुरू केला. मात्र वैयक्तिक आयुष्यात त्यांना खरे प्रेम मिळू शकले नाही. अभिनेता डॅनीसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं. त्यानंतर कबीर बेदी पुढे महेश भट यांना पण परवीनने डेट केलं. मात्र कोणतंच नातं फार काळ टिकलं नाही. अखेरच्या दिवसात गंभीर आजाराने त्यांचे निधन झालं. अखेरपर्यंत त्या एकट्या होत्या.

आपल्या अदाकारीने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेडं करणाऱ्या अभिनेत्री रेखा यांचे वैयक्तिक आयुष्य मोठ्या चढ-उताराचे राहिले. अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांच्या अफेअरच्या चर्चा खूपदा झाल्या. मात्र रेखा यांनी वास्तवात मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केले. अग्रवाल यांनी आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेनंतर रेखा यांच्यावर खूप टीका झाली. पण आजपर्यंत रेखा यांनी दुसरे लग्न केलेले नाही.

जया बच्चन यांच्या लव्ह लाईफबद्दल अनेक चर्चा रंगायच्या. मात्र जया यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न केले. अमिताभ यांचे नाव सातत्याने रेखा यांच्याशी जोडले गेल्याने जया बच्चन यांचे वैयक्तिक आयुष्य काही काळ ताणतणावाचे राहिले. असे बोलले जाते की, जया यांनी एका पार्टीत रेखा यांच्या कानशिलात लगावली होती.

महत्वाच्या बातम्या-
Raj Thackeray : टीका करणाऱ्यांना राज ठाकरेंचे सडेतोड उत्तर, म्हणाले, माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील सर्व..
‘शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, पण आत्महत्या करू नका’; एकनाथ शिंदेंचं भावनिक पत्र
दहशतवादी हल्ल्याचा पर्दाफाश; देशातील ‘या’ बड्या नेत्याला मारण्याचा ‘असा’ रचला कट

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now